Table Tennis : परभणीच्या आद्या- शरयूची उल्लेखनीय कामगिरी; राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा

Table Tennis : परभणीच्या आद्या- शरयूची उल्लेखनीय कामगिरी; राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा

परभणी : पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत परभणी येथील खेलो इंडिया टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली यामध्ये आद्या महेश बाहेती हीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अकरा वर्षीय मुलीच्या गटात अंतिम फेरीत खेळत रौप्यपदक पटकावले. उप-उपांत्य पूर्व सामन्यात नागपूरच्या साची माटे वर 3-1 असा विजय मिळवत आद्याने उप-उपांत्य फेरी गाठली. उपांत्य पूर्व सामन्यात ठाण्याच्या प्रिषा मलिक वर 3-1 असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीतील सामन्यात ठाणेच्याच ज्ञानश्री तर्डे वर 3-1असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरी खेळत तीने अकरा वर्ष मुलींच्या गटात रौप्यपदक पटकावले.
तसेच तेरा वर्षीय मुलींच्या गटात कु आद्या महेश बाहेती व कु शरयू माधव टेकाळे ह्यांनी उप-उपांत्य सामने खेळत परभणी जिल्ह्याचे नाव उंचावत विजयाचा झेंडा रोवला. भारतीय खेळ प्राधिकरण (साई) यांच्यामार्फत चालणाऱ्या खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र परभणी येथे प्रशिक्षक श्री चेतन मुक्तावार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतात. या दोन्हीही खेळाडू स्कॉटिश अकॅडमी या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी, क्रीडा व युवक सेवा संचलनालय म.रा.पुणे व भारतीय खेळ प्राधिकरण (साई) यांचे सहकार्य लाभते. या खेळाडूंच्या सरावासाठी विजय अवचार,अजिंक्य घन, तुषार जाधव,सुरज भुजबळ, रोहित जोशी, विशाल मेहता, शिवप्रसाद कदम,गौस खान पठाण, चेतन सुरवसे, विक्रम हत्तेकर,निखील झुटे यांनी परिश्रम घेतले.

या कामगिरीबद्दल जिल्हा क्रीडाधिकारी जयकुमार टेंबरे,राज्य क्रीडा मार्गदर्शक  संजय मुंढे, क्रीडा अधिकारी  शैलेंद्रसिंग गौतम परभणी सिटी क्लबचे सचिव डॉ.विवेक नावंदर व पदाधिकारी, जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष समशेर वरपुडकर, कार्याध्यक्ष डॉ.माधव शेजुळ, सचिव गणेश माळवे, सहसचिव ज्ञानेश्वर पंडित,संतोष सावंत, नागेश जोशी, धीरज नाईकवाडे, प्रभाकर पंडित तसेच वरिष्ठ खेळाडू, पालक सदस्यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!