Cotton : सेलू्तील कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा : डॉ.संजय रोडगेंसह संचालकांची मागणी 

Cotton : सेलू्तील कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा : डॉ.संजय रोडगेंसह संचालकांची मागणी 

जिल्ह्यातील इतर ठिकाणी बाजार समितीच्या माध्यमातून कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे, परंतु सेलू येथील कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने पुन्हा शेतकऱ्याची अडवणूक केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, या पार्श्वभूमीवर बाजार समितीने तात्काळ कापूस खरेदी तात्काळ सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सेलू जि.परभणी : सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कापूस खरेदी केंद्र अद्याप सुरू केलेले नसल्यामुळे सेलू तसेच परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मराठवाड्यातील प्रत्येक शहरातील तसेच खेडेगावातील कापूस सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी जास्त प्रमाणात येत असतो. याठिकाणी सर्वात जास्त जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी असल्यामुळे कापसाला चांगला भाव मिळत आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणी बाजार समितीच्या माध्यमातून कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे, परंतु सेलू येथील कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्याने पुन्हा शेतकऱ्याची अडवणूक केली जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

सध्या दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून आपला कापूस विक्री करण्यासाठी तयार आहे. तरी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे, असे निवेदन सभापती व सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू यांना देण्यात आले. निवेदनावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. संजय रोडगे, ॲड.दत्तराव कदम, रामेश्वर राठी, गोकर्णा पडघन, प्रसाद डासाळकर अनिल पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!