CBSE Heritage India Quiz- 2023 : सेलूतील रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या तीन विद्यार्थिनींची निवड
इंडिया हेरिटेज सेमीफाइनल राऊंडसाठी निवड
नागपूर येथे सुरू असलेल्या ऑनलाईन इंडिया हेरिटेज प्रश्नमंजुषेत सेलू (जि.परभणी) येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलच्या खुशी मानधणे, दर्शिका दगडू, श्रुती हाडुळे या तीन विद्यार्थिनींची ऑफलाईन सेमीफाइनल राऊंडसाठी निवड झाली आहे.
सेलू जि.परभणी : नागपूर येथे सुरू असलेल्या ऑनलाईन इंडिया हेरिटेज प्रश्नमंजुषेत सेलू (जि.परभणी) येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलच्या खुशी मानधणे, दर्शिका दगडू, श्रुती हाडुळे या तीन विद्यार्थिनींची ऑफलाईन सेमीफाइनल राऊंडसाठी निवड झाली आहे.
केंद्रीय माध्यमिक बोर्ड दिल्ली द्वारा आयोजित इंडिया हेरिटेज प्रशमंजुषा विभागीय स्तर, सेमी फायनल व फायनल राष्ट्रीयस्तर अशा राउंडमध्ये घेण्यात येणार आहे. एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश सिबीएसई स्कूलच्या खुशी मानधणे, दर्शिका दगडू, श्रुती हाडुळे यांनी पहिल्या ऑनलाईन राऊंडमध्ये कमीत कमी वेळेत प्रश्नमंजुषेत सर्व प्रश्नांची उत्तरे सोडवली व सेमी फायनल राऊंडसाठी नागपूर येथे निवड झाली. यां इंडिया हेरिटेज प्रश्नमंजुषासाठी इतिहास विभाग प्रमुख शिक्षक राहुल साऊ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सीबीएसई पुणे विभागातून टॉप ३० शाळेत प्रिन्स इंग्लिश स्कूलने स्थान मिळवले आहे.
या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी, प्रा.महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील सेमीफाइन राऊंडसाठी शुभेच्छा दिल्या.