National Table Tennis : टेबल टेनिसमध्ये परभणी संघांची चमकदार कामगिरी; आद्या-शरयुची उप उपांत्यपूर्व फेरीत धडक

National Table Tennis : टेबल टेनिसमध्ये परभणी संघांची चमकदार कामगिरी; आद्या-शरयुची उप उपांत्यपूर्व फेरीत धडक

परभणी : मध्यप्रदेशातील भोपळ येथे सीबीएसई दिल्ली बोर्ड व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत सुरू असलेल्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये परभणीच्या स्कॉटिश ॲकॅडमी टेबल टेनिस संघाने साखळी फेरीतील ‘ब’ गटात आसाम व गुजरातच्या संघांचा पराभव करत चमकदार कामगिरी केली. बाद फेरीसाठी संघाने पात्रता मिळविली. संघातील आद्या महेश बाहेती व शरयू माधव टेकाळे यांनी आपापले एकेरी व दुहेरी सामने जिंकत परभणी संघाला बाद फेरीसाठी पात्र केले. उपांत्य पूर्व सामन्यात परभणी संघाला चेन्नई संघाकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर १४ वर्ष मुलीच्या सांघिक गटातील आव्हान संपुष्टात आले. मात्र, निवड चाचणी वैयक्तिक क्रीडा प्रकारात शरयू व आद्याने चांगली कामगिरी केली. यामुळे फेडरेशन गेम्ससाठी निवड होणाऱ्या सीबीएसई संघाच्या दोन्ही खेळाडूंच्या निवडीची आशा आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!