Maratha Reservation : अधिकाधिक कुणबी नोंदी शोधा; सकल मराठा समाजाची सेलूत मागणी 

Maratha Reservation : अधिकाधिक कुणबी नोंदी शोधा; सकल मराठा समाजाची सेलूत मागणी 

तहसीलदारांना निवेदन, कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी

 

सेलू जि.परभणी : महाराष्ट्र शासनाने मराठा कुणबी नोंद असलेले कागदपत्रे शोधायचे आदेश दिलेले आहेत. पण, सेलू तालुक्यातील ९५ गावांपैकी फक्त १३ गावात ३६१ मराठा कुणबी नोंदी सापडलेले आहेत. ही संख्या तालुक्याच्या मानाने अत्यंत नगण्य आहे. अधिकाधिक कुणबी नोंदी प्रशासनाने शोधाव्यात, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी, २४ नोव्हेंबर रोजी करण्यात आली आहे.

तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तेरा गावात कुणबी नोंदी सापडल्या म्हणजे तालुक्यातील उरलेले ८२ गावातील लोक वंचित राहतील. सेलू तहसील व्हायच्या अगोदर सेलू तालुका पाथरी व जिंतूर तालुक्याला संलग्न होता. म्हणून ताबडतोब शासनाची संपूर्ण यंत्रणा लावून संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावातील नोंदी सापडाव्यात नसता सकल मराठा समाज सेलूच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईद, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या वेळी जयसिंग शेळके, प्रसाद महाराज काष्टे, पांडुरंग कदम, हरिप्रसाद काष्टे, रामेश्वर गटकळ, अजित मोगल, रामेश्वर गाडेकर, विजय मैफळ, शिवहरी शेवाळे, रामेश्वर लिपणे, शक्ती बोराडे, निशिकांत रोडगे, अजित पवार, गणेश निवळकर, अशोक ताठे, मुंजाजी लिपणे, बालाजी लिपने, शिवम गटकळ, महादेव गटकळ, कैलास पवार, पांडुरंग डासाळकर, गोविंद शेळके, दिगंबर सोळंके, सतीश गटकळ, विकास शेवाळे, शिवाजी काष्टे, विठ्ठल काष्टे, शिवम शेवाळे, राजेश शेवाळे, दिपक गटकळ, सखाराम नाटकर, संदीप नागटिळे, कैलास लहाने, रमेश शेळके, किशन गोरे, दीपक उकलकर, कैलास मोगल, रामेश्वर जाधव, अनिल शेलार, माणिक लिपणे, विलास रोडगे, कल्याण ताठे, माऊली ताठे, राहुल सपाटे, आकाश रोडगे, ज्ञानेश्वर आवटे आदींसह शेकडो मराठा समाज बांधव उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!