संविधान दिन : सेलूतील प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये कार्यक्रम
सेलू जि.परभणी : सेलू् येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये संविधान दिनाचा कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे तसेच संविधान ग्रंथाचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे होते. क्रांती फाउंडेशनच्या पोर्णिमा जोहिरे, ॲड.रोहिणी बोराडे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्रगती क्षिरसागर, महादेव साबळे, स्मिता शर्मा, छाया पाचलेगावकर, रत्नपारखी, वाघमारे, शुभांगी सांगळे, सीमा शेख, सोनु वटाणे आदींसह विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.