सेलूच्या नूतन विद्यालयात संविधान दिन उत्साहात
सेलू जि.परभणी : येथील नूतन विद्यालयात रविवारी, २६ नोव्हेंबररोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे तसेच संविधान ग्रंथाचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी मुख्याध्यापक बाबासाहेब हेलसकर, पर्यवेक्षक किरण देशपांडे, गणेश माळवे, अरविंद अंबेकर, अरुण रामपूरकर, केशव डहाळे आदींची उपस्थिती होती. आभार देशपांडे यांनी मानले.