सेलूच्या साक्षी कुलकर्णीला एमटेक पदवी प्रदान
सेलू जि.परभणी : सेलू येथील साक्षी श्रीपाद कुलकर्णी या विद्यार्थिनीला भोपाळ येथील एन्आयटी काॅलेजमध्ये शनिवारी २५ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित दीक्षांत समारंभात एमटेक पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. अगदी प्रतिकुल परिस्थितीवर मात करत साक्षीने हे यश मिऴविले आहे. कठोर व सातत्यपूर्ण परिश्रमातून निश्चितच यश मिळते, हेही तीने सिध्द करुन दाखवले. साक्षीचे वडील श्रीपाद कुलकर्णी हे एक शेतकरी व पत्रकार आहेत. साक्षीच्या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.