राज्यस्तरीय पुरस्कार : आदर्श शाळांसह २८ शिक्षकांचा होणार सन्मान; सेलूच्या कीर्ती राऊत यांना पुरस्कार

राज्यस्तरीय पुरस्कार : आदर्श शाळांसह २८ शिक्षकांचा होणार सन्मान; सेलूच्या कीर्ती राऊत यांना पुरस्कार

परभणी जिल्ह्यातून सेलू येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेतील शिक्षिका कीर्ती अशोक राऊत यांना राज्यस्तरीय शिक्षक सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या बद्दल राऊत यांचे अभिनंदन होत आहे. 

राज्यस्तरीय पुरस्कार : आदर्श शाळांसह २८ शिक्षकांचा होणार सन्मान; सेलूच्या कीर्ती राऊत यांना पुरस्कार

१०० शिक्षक क्लबतर्फे महात्मा फुले स्मृतीदिनानिमित्त उपक्रम; पाच शाळांना राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार

जालना/परभणी : जालना येथील १०० शिक्षक क्लबतर्फे महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी २८ खासगी व जिल्हा परिषदेच्या शिक्षक-शिक्षिकांना राज्यस्तरीय शिक्षक सेवागौरव पाच शाळांना राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यंदाही पुरस्कारप्राप्त शिक्षकांची व शाळांची नावे पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष आर.आर.जोशी यांनी जाहीर केली. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष राजेभाऊ मगर, सदस्य दीपक चाटे, डॉ.शिवनंदा मेहेत्रे, माया कवानकर, मनीषा पाटील, संदीप इंगोले व अमोल खंडारे उपस्थित होते.

पुरस्कारप्राप्त शिक्षकांत चंद्रपूरच्या मंगला मिलिंद बंडीवार, वर्ध्याच्या श्यामला राजेश चौधरी, अंमळेरचे विजयसिंग आधारसिंग पवार, पनवेलच्या प्रणोती विवेक भावसार, धाराशिवचे उमाकांत मधुकरराव कुलकर्णी, मुंबईच्या स्पृहा सुरेश इंदू, ब्रह्मपुरी चंद्रपुरच्या गीता उद्धवराव सेलोकर, नरखेड (नागपूर) धनंजय नारायणराव पकडे लाडसावंगीच्या (छत्रपती संभाजीनगर) सुषमा उदगीरचे किरण जायकोबा नेमट, या शाळांची निवड सुरेशराव राऊतमारे, मिरज (सांगली) अस्मा अमजद खान नदाफ, नाशिकच्या दीपाली सुकलाल अहिरे, पांगरी (बार्शी) सचिन सदाशिव उपरे, पारनेर लालवाडीच्या शुभांगी चंद्रकांत चाटे, साताऱ्याचे उमेश चंद्रकांत खोले, धाड (बुलडाणा) डॉ. अमोल सखाराम सातव, गेवराई (बीड) ज्ञानेश्वर विक्रमराव तळेकर, गडचिरोलीचे मेघश्याम रामचंद्र लांजेवार, किनवट (नांदेड) किशोर जनार्दन कावळे, सेलूच्या‌ (परभणी ) कीर्ती अशोक राऊत, रिसोडचे साईनाथ माधवराव शिंदे, मंगरुळ (यवतमाळ) जया गोरखनाथ गणवीर यांच्यासह जालना जिल्ह्यातील टेंभुर्णीचे नंदकुमार बाळकृष्ण काळे, चांदई एक्को (भोकरदन) जगन विठोबा वाघमोडे, इंदेवाडी जालनाच्या अनुजा विठ्ठलराव राऊत, मांडवा बदनापूरच्या सविता भगवान तायडे, जामखेड अंबडच्या करुणा कोंडीबा किवंडे, शेलगाव (बदनापूर) जगन्नाथ श्रीराम घुगे आदींची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

या शाळांना पुरस्कार…

काजळा केंद्रातील जि.प.प्राथमिक शाळा देवपिंपळगाव, भिलपुरी खुर्द जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चित्रवडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जालन्यातील संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालय, भाग्यनगर तर विवेकानंद सेवा केंद्र, परतूर संचलित विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक शाळा परतूर (ता. परतूर) या पाच शाळांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.


MLA Rohit Pawar : शिक्षकांना इतर कामे नकोतच; ६० हजार शिक्षक भरती तात्काळ करा 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!