अवकाळीमुळे जिंतूरमध्ये पिकांचे मोठे नुकसान; मदतीची शेतकऱ्यांची मागणी
आमदार रोहित पवार, विजय भांबळे बांधावर
सोमवारी सकाळी आमदार रोहित पवार यांनी शेवडी परिसरात शेतात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर दिला. तहसीलदार सरोदे यांना दूरध्वनी द्वारे संपर्क करून शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून सरकारकडून तात्काळ मदत मिळवून द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. या वेळी माजी आमदार विजय भांबळे, मनोज थिटे, बाळासाहेब घुगे, बाळासाहेब भांबळे, रामराव उबाळे, सुधाकर सानप, जगन काळे, दिगंबर घुगे, विजय खिस्ते आदींसह शेतकरी पदाधिकारी उपस्थित होते.
परभणी : सोमवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील आठही महसूल मंडळात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान युवा संघर्ष पदयात्रेवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार, माजी आमदार विजय भांबळे यांनी थेट बांधावर जाऊन पिक नुकसानाची पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर दिला. अधिकार्यांशी संपर्क साधून नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळवून द्यावी अशी मागणी केली.
जिंतूर, सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. जिंतूर, आडगाव, वाघी धानोरामध्ये शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पावसामुळे ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या परिसरातील शेतशिवारासह सावंगी, बामणी, बोरी, चारठाणा, दुधगावमंडळातील उभे तुरीचे पीक सपशेल जमिनीवर आडवे पडले आहे.क्षतुरीचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापसाची अर्धी वेचणी बाकी असतानाच हा अवकाळी पाऊस आल्याने कापूस संपूर्ण मातीत मिसळला आहे. ज्वारी, गहू , हरभरा आदींसह अन्य रब्बी पिके जमीनदोस्त झाली आहेत. फळबागा उध्वस्त झाल्या आहेत. सोमवारी सकाळी आमदार रोहित पवार यांनी शेवडी परिसरात शेतात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर दिला. तहसीलदार सरोदे यांना दूरध्वनी द्वारे संपर्क करून शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून सरकारकडून तात्काळ मदत मिळवून द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. या वेळी माजी आमदार विजय भांबळे, मनोज थिटे, बाळासाहेब घुगे, बाळासाहेब भांबळे, रामराव उबाळे, सुधाकर सानप, जगन काळे, दिगंबर घुगे, विजय खिस्ते आदींसह शेतकरी पदाधिकारी उपस्थित होते.
सत्ताधाऱ्यांकडूनच ‘ओबीसी विरूद्ध मराठा’ वाद वाढविण्याचा प्रयत्न : आमदार रोहित पवार