अवकाळीचा तडाखा : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी
परभणी : रात्री झालेल्या जोरदार पावसाने नुकसानग्रस्त भागातील पिकांची आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली.
अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी जिल्हा यंत्रणेला दिले. परभणी तालुक्यातील बलसा, पिंगळी येथील शेतात प्रत्यक्ष जाऊन पिकाची नुकसानीची पाहणी केली व जिल्ह्यामध्ये नुकसान झालेल्या भागांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व संबंधित तलाठी मंडळ अधिकारी, कृषी सहायक यांना दिलेत. जिल्हाधिकारी यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार संदीप राजपुरे अन्य अधिकारी कर्मचारी यांनी पाहणी केली. परभणी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक, तलाठी, मंडळ अधिकारी, शेतकरी यावेळी उपस्थित होते.