Yuva Sangharsh Padyatra : सामान्यांचा आवाज हिवाळी अधिवेशनामध्ये मांडणार : आमदार रोहित पवार

Yuva Sangharsh Padyatra : सामान्यांचा आवाज हिवाळी अधिवेशनामध्ये मांडणार : आमदार रोहित पवार

जिंतूरमधये युवा संघर्ष पदयात्रेचे जोरदार स्वागत, महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती

Yuva Sangharsh Padyatra : सामान्यांचा आवाज हिवाळी अधिवेशनामध्ये मांडणार : आमदार रोहित पवार

आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहेच. परंतु सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. मंत्री मंत्रालय बसून असतात. ओएसडी पंचतारांकित हॉटेलमध्ये फाईल घेऊन बसतात. मंत्र्यांच्या हिताच्या फाईलवरच सह्या केल्या जातात. ठोस मदत देण्याचे स्पष्ट केले नसल्याने दुसऱ्या टप्प्यातील दुष्काळग्रस्तांची सरकारने चेष्टा मांडली आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदू- मुस्लिम ऐवजी आता ओबीसी विरूद्ध मराठा असा वाद लावून राजकीय पोळी भाजून घेण्याचे प्रयत्न भाजप आणि सत्ताधारी करीत आहेत, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.

Yuva Sangharsh Padyatra : सामान्यांचा आवाज हिवाळी अधिवेशनामध्ये मांडणार : आमदार रोहित पवार

परभणी : शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुण, तरूणी, विद्यार्थी, छोटे मोठे व्यावसायिक, व्यापारी, व्यवस्थेला सरकारकडून अडचणीत आणले जात आहे. राज्य सरकार आणि मंत्री मुद्याचे बोलत नाहीत. त्यामुळे युवा संघर्ष पदयात्रेच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार आहोत. ज्वलंत प्रश्नांवर सरकार जर कमी पडत असेल, तर सरकारला गुडघ्यावर आणू, अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रविवारी, २६ नोव्हेंबररोजी सायंकाळी जिंतूर शहरात युवा संघर्ष पदयात्रेचे जोरदार स्वागत झाले. या निमित्ताने आयोजित जाहीर सभेत आमदार पवार बोलत होते. राज्यसभा सदस्य डॉ.फौजिया खान, माजी आमदार विजय भांबळे, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील, काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर, संदीप क्षीरसागर, विजय गव्हाणे, प्रेक्षा भांबळे, हेमंतराव आडळकर, अजय गव्हाणे, अशोक काकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार पवार म्हणाले की, सर्व सामान्यांच्या ३५ मुद्यांना घेऊन युवा संघर्ष पदयात्रा सुरू आहे. आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहेच. परंतु सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. मंत्री मंत्रालय बसून असतात. ओएसडी पंचतारांकित हॉटेलमध्ये फाईल घेऊन बसतात. मंत्र्यांच्या हिताच्या फाईलवरच सह्या केल्या जातात. ठोस मदत देण्याचे स्पष्ट केले नसल्याने दुसऱ्या टप्प्यातील दुष्काळग्रस्तांची सरकारने चेष्टा मांडली आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदू- मुस्लिम ऐवजी आता ओबीसी विरूद्ध मराठा असा वाद लावून राजकीय पोळी भाजून घेण्याचे प्रयत्न भाजप आणि सत्ताधारी करीत आहेत, असा आरोप पवार यांनी केला. याप्रसंगी मान्यवरांची भाषणे झाली. विजय भांबळे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले.‌ माजी आमदार संजय वाघचौरे, रोहित पाटील, जाकेरलाला, संतोष बोबडे, मनोज थिटे आदींसह महाविकास आघाडी घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Yuva Sangharsh Padyatra : सामान्यांचा आवाज हिवाळी अधिवेशनामध्ये मांडणार : आमदार रोहित पवार


सर्वांच्या ‘मनातले आमदार’ म्हणून विजय भांबळेंचा जिंतूरमध्ये विजय निश्चित आहे. परभणी लोकसभेत महाविकास आघाडीचा एकच उमेदवार सर्व संमतीने दिला जाणार असून आघाडीचे सर्वच नेते ताकदीनिशी उतरणार आहेत. खासदार जाधव आणि भांबळे यांनी एकमेकांची काळजी घ्यावी, असे नमूद करून परिवर्तनाची हाक देत महाविकास आघाडीला बळकट करण्याचे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले.


सध्या राज्यात भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधाऱ्यांकडून धर्मवाद आणि जातीयवाद मोठ्या प्रमाणावर वाढविला जात आहे. असा आरोप आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपाचा पूर्वीपासूनच आरक्षणाला विरोध आहे, असे सांगून मंत्री छगन भुजबळ समतेऐवजी आता भाजपाची समरसतेची भाषा बोलत आहेत‌. अशी टीका केली. गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना इतर कोणत्याही प्रकारची कामे नकोत असे नमूद करून ६० हजार शिक्षकांची तसेच अडीच लाखांची रखडेली पदभरती प्रक्रिया सरकारने तातडीने राबवावी, असे पवार म्हणाले.


अवकाळीचा तडाखा : कापूस, तूर, ज्वारी पिकांचे मोठे नुकसान; परभणीतील २२ मंडळामध्ये अतिवृष्टी

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!