राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार : कीर्ती राऊत यांचा जालना येथे गौरव
जालना/परभणी : जालना येथील शिक्षक क्लबच्या वतीने सेलू येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेतील शिक्षिका व साने गुरुजी कथामालेच्या कार्यकर्त्या कीर्ती अशोक राऊत यांना राज्यस्तरीय शिक्षक सेवा गौरव पुरस्काराने सोमवारी गौरविण्यात आले. विधी विभागाच्या उपसचिव सायली कांबळी, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्राचार्य डॉ.गणेश अग्निहोत्री आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. पुरस्काराबद्दल साने गुरुजी कथामालेचे आर.आर.जोशी, डॉ.सुहास सदाव्रते, कल्पना हेलसकर , प्रमोद देशमुख, विजय वायाळ, महादेव आगजाळ आदींसह विविध स्तरांतून राऊत यांचे अभिनंदन होत आहे.