महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन; रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये कार्यक्रम

महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन; रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये कार्यक्रम

श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ” विद्यार्थ्यांनी महात्मा फुलेंचा इतिहास नेहमीच डोळ्यासमोर ठेवावा. सर्वसामान्यांना शिक्षण मिळावे म्हणून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी किती यातना सोसल्या आहेत. याची जाणीव ठेवावी. आयुष्याच्या जडणघडणीत शिक्षणाचे खूप महत्त्वाचे आहे.”

 

महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन; रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये कार्यक्रम

सेलू जि.परभणी : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे होते. प्राचार्य कार्तिक रत्नाला व शिक्षक उपस्थित होते. डॉ.संजय रोडगे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ” विद्यार्थ्यांनी महात्मा फुलेंचा इतिहास नेहमीच डोळ्यासमोर ठेवावा. सर्वसामान्यांना शिक्षण मिळावे म्हणून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी किती यातना सोसल्या आहेत. याची जाणीव ठेवावी. आयुष्याच्या जडणघडणीत शिक्षणाचे खूप महत्त्वाचे आहे. महात्मा फुलेंनी ‘तृतीय रत्न’ नाटकाच्या माध्यमातून शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे, असा महत्त्वाचा संदेश दिला आहे. फुलेंनी शिक्षणाची दारे सर्वांसाठी उघडली म्हणून आज प्रत्येकाला चांगल्या पद्धतीने शिक्षण उपलब्ध झाले आहे.” सूत्रसंचालन कल्पना भाबट यांनी केले.”

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!