विवेकानंद शाळेत महात्मा फुले यांना अभिवादन
सेलू : शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचeलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक शंकर शितोळे, रागिणी जकाते, अनिल कौसडीकर, विजय चौधरी, विनोद मंडलिक, गजानन साळवे, शंकर राऊत, काशिनाथ पांचाळ ,चेतन नाईक, दीपाली पवार, शारदा पुरी, शालवी जोशी, चंदू कव्हळे आदींची उपस्थिती होती.