परभणी जिल्ह्यात तीव्र दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांचे सत्याग्रह आंदोलन
खासदारांची पत्रकार परिषद, आमदार मेघना बोर्डीकरांचे कृषिमंत्र्यांना निवेदन
परभणी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी शिवसेना (उध्दव ठाकरे) खासदार संजय जाधव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. मागील तीन दिवसापासून अवकाळी पाऊस व वादळी वार्यामुळे शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. सरकारनेने केवळ आर्थिक मदत न देता दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, असे जाधव म्हणाले.
परभणी : दुष्काळग्रस्त व आवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करून जिल्ह्यात तीव्र दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चा व किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह व धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. या वेळी कॉम्रेड राजन क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, शिवाजी कदम, रामेश्वर बचाटे, रामेश्वर आवरगंड, ओंकार पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. दुष्काळातून वगळलेल्या १३ महसूल मंडळाचा समावेश करा, अतिवृष्टी बाधीत पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा.श, गोदावरी नदीवरील सर्व बंधाऱ्यात पाणी साठा द्या, सर्व खरिप व रब्बी पिकांना पिकवीमा भरपाई द्या. कापसाला १२ हजार रुपये, सोयाबीनला ८ हजार रुपये हमी भाव, तर ऊसाला प्रतिटन साडे चार रुपये दर द्यावा, प्रस्थापित विज कायदा रद्द करा, किमान आधारभूत किंमतीचा कायदा करा.पीक विमा योजनेत समुळ बदल करा. लखीमपुर खेरी मधील गुन्हेगारांना शिक्षा, मासोळी धरणातील पाणी पाणी पुरवठा योजनेसाठी आरक्षित करा व औद्योगिक पाणी पुरवठा बंद करा आदी मागण्यांचा निवेदनात नमूद आहेत.आंदोलनात शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पालकमंत्री बनसोडेंचे आदेश
परभणी जिल्ह्यात अवकाळी पाऊसामुळे परभणी, गंगाखेड, जिंतूर, पाथरी, पूर्णा, पालम मानवत, सोनपेठ, सेलू तालुक्यातील सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी ज्वारी, कापूस, हरभरा, फळबागा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बुधवारी पूर्णा तालुक्यात पिकांच्या नुकसानीची शेतात जावून पाहणी केली.
आमदार बोर्डीकरांचे कृषिमंत्र्यांना निवेदन
परभणी जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या जिंतूरच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली आहे.
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची आमदार बोर्डीकर यांनी मुंबईत भेट घेऊन निवेदन सादर केले. अतिवृष्टीची तपशीलवार माहिती दिली.
सरसकट कर्जमाफी द्या : खासदार जाधव
परभणी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी शिवसेना (उध्दव ठाकरे) खासदार संजय जाधव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. मागील तीन दिवसापासून अवकाळी पाऊस व वादळी वार्यामुळे शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. सरकारनेने केवळ आर्थिक मदत न देता दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, असे जाधव म्हणाले.