माजी आमदार विजय भांबळेंचा वाढदिवस साधेपणाने
अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदतीची मागणी
आरक्षणाचा मुद्दा तसेच जिंतूर, सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यामध्ये रविवारी रात्री व सोमवारी पहाटे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी आमदार विजय भांबळे यांचा वाढदिवस मंगळवारी, २८ नोव्हेंबर रोजी साधेपणाने साजरा करण्यात आला.
परभणी : वाढदिवसानिमित्त मंगळवारी, २८ नोव्हेंबर रोजी माजी आमदार विजय भांबळे यांनी जिंतूर येथील ‘केशव’ निवासस्थानी नागरिक व स्नेहजणांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे जिंतूर, सेलू येथे आयोजन करण्यात आले नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्ष, संघटना, सामाजिक, शैक्षणिक, सेवाभावी संस्थांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भांबळे यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच गर्दी केली होती. या निमित्ताने भांबळे यांनी सांगितले की, जिंतूर तालुक्यात रविवारी रात्री व सोमवारी पहाटे वादळीवाऱ्यासह ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. तालुक्यातील सर्व मंडळात यामुळे कापूस, तूर, गहू, ज्वारी, हरभरा आदींसह अन्य खरीप व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. फळबागांनाही मोठा तडाखा बसला आहे. महसूल प्रशासनाने जिंतूर सेलू तालुक्यासह परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पिका विमा तात्काळ मंजूर करावा. जिंतूर तालुक्यात एवढे पिकांचे नुकसान झाले आहे. हे लक्षात घेता, आर्थिक मदत देतांना कोणत्याही अडचणी शेतकऱ्यांना निर्माण होता कामा नये. मागील वर्षीचा पिक विमा तसेच २०१८ मधील काही मंडळातील अतिवृष्टीचे थकीत अनुदान तातडीने मंजूर करून वाटप करावे, सततच्या पावसाची मंजूर अनुदान रक्कम तसेच रविवारी रात्री व सोमवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या जिंतूर, सेलू तालुक्यातील नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तातडीने जमा करण्यात यावी.
Pension Ki Tension : पेन्शनसाठी गुरूजींना हेलपाटे; सेलूतील तिघे त्रस्त
Telangana Election : आमदार मेघना बोर्डीकरांच्या शेरलिंगमपल्लीमध्ये रॅली