Shree Chinmaymurti Sansthan : माधवानंद स्वामींची मिरवणूक उत्साहात; सेलूमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

Shree Chinmaymurti Sansthan : माधवानंद स्वामींची मिरवणूक उत्साहात; सेलूमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

सेलू जि.परभणी : उमरखेडच्या श्री चिन्मयमूर्ती संस्थानचे मठाधिपती माधवानंद स्वामी महाराजांचे शुक्रवारी सायंकाळी सेलू (जि.परभणी) शहरात आगमन झाले. या निमित्ताने श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरापासून उत्साहात स्वागत मिरवणूक काढण्यात आली. सेलू शहरातील शिष्य रामरावमामा सावंगीकर कुटुंबियांच्या पुढाकाराने नऊ डिसेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी, एक डिसेंबररोजी सायंकाळी पाच वाजता महाराजांचे श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर परिसरात आगमन झाले. या वेळी शिष्यगणांनी पुष्पवृष्टी करून स्वागत झाले. सद्गुरू वामनानंद स्वामी यांचा; तसेच मठाधिपती माधवानंद स्वामी यांचा मोठा शिष्य परिवार सर्वदूर आहे. सेलू् येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने शनिवारपर्यंत (९ डिसेंबर) छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणीसह मराठवाड्यातील शेकडो शिष्यगणांची दर्शनासाठी मांदियाळी असणार आहे. ठिकठिकाणी पाद्यपूजा तसेच सावंगीकरांच्या जिंतूर कॉलनीतील निवासस्थानी दैनंदिन लघुरुद्र अभिषेक, विश्वांभर दर्शन सोहळा, महाआरती व महाप्रसादाचे (पुडी) आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच माधवानंद स्वामी महाराजांचा अमृत महोत्सव सेलूतील शिष्यगणांनी उत्साहात साजरा केला. या वर्षीही शिष्यगणांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

Shree Chinmaymurti Sansthan : माधवानंद स्वामींची मिरवणूक उत्साहात; सेलूमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन


संविधान लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : मिलिंद बोकील; मानवतमध्ये सर्वोदय कार्यकर्ता संमेलन उत्साहात

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!