Free Health Camp : सेलूत रविवारी मोफत आरोग्य शिबिर

Free Health Camp : सेलूत रविवारी मोफत आरोग्य शिबिर

सेलू मराठी पत्रकार संघ, डॉक्टर्स असोसिएशन व सरस्वती धन्वंतरी डेंटल कॉलेज परभणी यांचा उपक्रम

सेलू (जि.परभणी)  : सेलू् येथील अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ, डॉक्टर्स असोसिएशन व परभणीच्या सरस्वती धन्वंतरी डेंटल कॉलेजच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त रविवारी (तीन डिसेंबर) सकाळी दहा वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हुतात्मा स्मारक परिसरात आयोजित शिबिराचा दिव्यांगांनी तसेच पत्रकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

या प्रसंगी उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अशोकनाना काकडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार दिनेश झांपले, पोलीस निरीक्षक समाधान चवरे, पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष महंमद इलियास यांची उपस्थिती असेल. शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष डॉ.ऋतुराज साडेगावकर,  लक्ष्मण बागल,  किशोर कटारे, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष किशोर साळवे व संयोजकांनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!