मानवतमध्ये राज्य सबज्युनियर व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा उत्साहात
नागपूर, लातूर , पुणे, नाशिक विभागांची विजयी दौडघोड
परभणी : महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने व परभणी जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या सहकार्याने मानवत स्पोर्ट्स अकॅडमी मानवत जिल्हा परभणी आयोजित 45 वी सब ज्युनियर राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी व्हॉलीबॉल स्पर्धा 2023 स्पर्धेचे उद्घाटक म्हणून काँग्रेस शहराध्यक्ष शामभाऊ चव्हाण उपस्थित होते. अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर विभागाचे सचिव काजी अर्शद , हॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू तसेच मार्गदर्शक गोपाळभाऊ मंत्री ,तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बाबू आचरेकर, दत्ताभाऊ सोमवंशी, , राजेभाऊ कामखेडे स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून आठ विभागातून मुले व मुली असे 16 संघाचा सहभाग नोंदविला आहे.
उद्घाटनपर सामने मुलीमध्ये मुंबई विरुद्ध नागपूर मध्ये नागपूर २:० सेट वने विजयी तर मुलांमध्ये नागपूर विरुद्ध अमरावती मध्ये नागपूर २:१ सेट नेट विजयी, नाशिक वि. छ.संभाजीनगर मध्ये नाशिक २:० भेटीने विजयी, लातूर वि. छ.संभाजीनगर मध्ये लातूर २:०:भेटीने विजयी, पुणे वि. मुंबई मध्ये पुणे २:१ भेटीने विजयी ठरले . तसेच प्रास्ताविका मानवत स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष किशन भिसे यांनी केले तर सूत्रसंचालन नांदगावकर यांनी केले.
दहा डिसेंबरपासून नेताजी सुभाष विद्यालय क्रीडांगणावर स्पर्धा होत आहेत. राज्य व्हॉलीबॉल क्रीडा प्रकाश झोतात खेळवला जात आहेत. प्रेक्षकांसाठी प्रेक्षा गॅलरी करण्यात आली आहे. स्पर्धेस टेनिस व्हॉलीबॉल राज्य सचिव गणेश माळवे, राष्ट्रीय योग प्रशिक्षक डी.डी.सोन्नेकर, किशोर कटारे यांनी भेट दिली. स्पर्धा यशस्वीतेसाठी मानवत स्पोर्ट्स अकॅडमीच्या सचिव ज्ञानेश्वर ठोंबरे,रेंगे सर्व खेळाडूंनी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.