रंगीत करकोचे, घोंगलफोड्यांची वर्दळ ; सेलूजवळील दुधना नदी परिसरातील चित्र

रंगीत करकोचे, घोंगलफोड्यांची वर्दळ ; सेलूजवळील दुधना नदी परिसरातील चित्र

सेलू जि.परभणी : जिल्ह्यातील कोरडया पडत चाललेल्या दुधना नदीच्या पात्रात मागील काही दिवसांपासून घोंगलपफोडया आणि रंगीत करकोच्यांची वर्दळ वाढल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झााल्याने नद्या, नाले, पाझर तलावात पाण्याची पातळी खालावली. परंतु नोव्हेंबरच्या शेवटी अवकाळी पावसाने काही नदी, नाल्यांना पूर आल्याने पाणी जमा झााले आहे. पाझर तलावांमध्येसुदधा बऱ्यापैकी आले. त्यामुळे पाणपक्षी नजरेस पडत आहेत. पक्षी निरीक्षक विजय ढाकणे, माधव गव्हाणे, शरद ठाकर आणि अनया ढाकणे यांनी मोरेगाव (ता.‌सेलू) परिसरातील दुधना नदीपात्रात हे निरीक्षण नोंदविले आहे. त्यावेळी घोंगलफोडया (ओपन बिल स्टाॅर्क) किंवा उघडया चोचीचा करकोेचा, रंगीत करकोचे आदी पक्ष्यांनी गर्दी केल्याचे दिसून आले. तर चक्रवाक बदक, छोटा पाणकावळा, टिटवी, पांढरा बगळा, चमचा (स्पून बिल), हळदी कुंकु बदक, काळया डोक्याचा शराटी, काळा शराटी आदी पक्षी पाण्याच्या डबक्यात विहार करीत आहेत.

उथळ पाण्यात सहज खाद्य उपलब्ध असल्याने काही पक्ष्यांची गर्दी आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे यावर्षी विविध प्रजातींचे स्थलांतरित पक्षी दिसेनासे झाले आहेत. अजून काही दिवस वाट पहावी लागणार आहे.विजय ढाकणे, पक्षी निरीक्षक

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!