‘माकप’च्या विभागीय कार्यशाळेचे सेलूत उद्घाटन
सेलू जि. परभणी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दोन दिवसीय मराठवाडा विभागीय कार्यशाळेला सेलू येथे मंगळवारी, १२ डिसेंबररोजी उत्साहात सुरुवात झाली. मार्गदर्शक म्हणून राज्य सचिव कॉम्रेड उदय नारकर, कॉम्रेड सुनील मालुसरे, कॉम्रेड एम.एच.शेख, कॉम्रेड विजय गाभणे आदींची प्रमुख उपस्थिती आहे. कार्यशाळेत मुख्यतः मराठवाड्यातील विकासाच्या अनुशेष, शेती व पाणी प्रश्न, राज्य देशातील राजकिय परिस्थिती, मराठा आरक्षण आंदोलन आदी मुद्यावर चर्चा करून पुढील आंदोलनात्मक दिशा ठरवण्यात येणार आहे. तसेच पक्ष बांधणी व सक्षमीकरणासाठी व्युहरचना आखली जाणार आहे, असे कॉम्रेड रामेश्वर पौळ यांनी सांगितले. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील माकप जिल्हा कमिटीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत. १३ डिसेंबररोजी दिवसभर विविध विषयांवर चर्चा होणार आहे. परभणी जिल्हा कमिटीच्या वतीने आयोजित कार्यशाळेसाठी कॉम्रेड रामेश्वर पौळ, दत्तुसिंग ठाकूर, रामकृष्ण शेरे पाटील, उध्दव पौळ, नशीर शेख, दीपक लिपणे अशोक बुरखुंडे, रामराजे महाडिक, राजु दक्ष आदींंसह कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.