पंचमुखी पावन गणपती : प्रतिष्ठापना सोहळा शुक्रवारपासून; सेलूमध्ये भरगच्च कार्यक्रम

पंचमुखी पावन गणपती : प्रतिष्ठापना सोहळा शुक्रवारपासून; सेलूमध्ये भरगच्च कार्यक्रम

भाविकांनी लाभ घेण्याचे अशोक उपाध्ये, मुकुंद आष्टीकर यांचे आवाहन

पंचमुखी पावन गणपती : प्रतिष्ठापना सोहळा शुक्रवारपासून; सेलूमध्ये भरगच्च कार्यक्रम

सेलू शहरात श्री सिद्धिविनायकाचे प्राचीन मंदिर आहे. अशोकनगरमध्ये उभारण्यात आलेल्या मंदिरातील मूर्ती पंचमुखी आहे हे विशेष. काळ्याशार पाषाणातील साधारण तीन फुटी पूर्वाभिमुख मूर्ती विलोभनीय आहे. शेंदुरलेपनानंतर मूर्तीला चैतन्यदायी स्वरूप प्राप्त होईल. रंगीबेरंगी काचांनी गाभाऱ्यात सुंदर नक्षीकाम केलेले आहे. संगमरवरातील मूषक लक्षवेधी आहे. उद्यानाने मंदिर परिसराची शोभा वाढणार आहे.


सेलू जि.परभणी : सेलू-सातोना रस्त्यावरील अशोकनगर परिसरात भव्य पंचमुखी पावन गणपती मंदिर उभारण्यात आले आहे. मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त शुक्रवार ते सोमवारपर्यंत (१५ ते १८ डिसेंबर) विविध धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक आदी भरगच्च कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत. संयोजक मुकुंद आष्टीकर यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी उमरखेडच्या श्री चिन्मयमूर्ती संस्थानचे माधवानंदगुरू वामनानंद स्वामी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शुक्रवारी प्रायश्चित्त विधी, शनिवार व रविवारी शांती पाठ, प्रधान संकल्प, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदी श्राध्द ब्राम्हणवर्णन, दिगरक्षण, पंचगव्य करण, भूमिपूजन, कुंडपूजन, अग्निमंथन,अग्निस्थापन, देवता स्थापन, नवग्रहस्थापन, ग्रहहवन, जलाधिवास, सायंपूजन, आरती, सोमवारी शिखर प्राणप्रतिष्ठा, पूर्णाहूती, आरती व रेणुका मंगल कार्यालयात महाप्रसादाने सांगता होणार आहे. भाविकांनी सहभागी व्हावे, दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरस्वती उपाध्ये, विना अशोक उपाध्ये, संचिता अभिजीत, जया मुकुंद आष्टीकर, श्रीनिवास आष्टीकर आदींंसह संयोजकांनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!