सेलू राष्ट्रवादीतील अनेकजण भाजपमध्ये; नागपुरात झाला प्रवेशाचा कार्यक्रम

सेलू राष्ट्रवादीतील अनेकजण भाजपमध्ये; नागपुरात झाला प्रवेशाचा कार्यक्रम

सेलू तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला लागलेली गळती काही करता थांबेना. भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील आणि राज्यातील सरकारची विकास कामे, लोककल्याणकारी योजना आणि जिंतूर, सेलूच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी तालुक्यात केलेली विकास कामे आणि भरीव कार्य यामुळे युवकांचा प्रतिसाद भारतीय जनता पार्टीला मिळत आहे. – ॲड.दत्तराव कदम, तालुकाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, सेलू

सेलू जि.परभणी : नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सेलू तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) वीस ते पंचवीस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी, १४ डिसेंबररोजी नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिंतूरच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, तालुकाध्यक्ष ॲड. दत्तराव कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे बाजार संचालक माऊली ताठे, केशवराव सोळंके यांच्यासह मालेटाकळी, ढेंगळी पिंपळगाव, देऊळगाव गात आजी माजी पदाधिकारी, सदस्य आदी पंचेवीस जणांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या वेळी ॲड.दत्तराव कदम, लक्ष्मणराव बुधवंत, अनिल पवार, अशोक लिपणे, सुनीलराव भोम्बे, पांडुरंग सोळुंके, विलास सोनवणे, अनंत पवार, दत्तराव कदम, भारत इंद्रोके, संजय घुले, शिवाजीराव कदम, भाऊराव लहाने, पांडुरंग सोळुंके आदींची उपस्थिती होती.

यांचा झाला प्रवेश : मालेटाकळी : ज्ञानेश्वर ताठे, विठ्ठल ताठे, अंबादास ताठे, नेताजी ताठे, महादेव ताठे कांतीराम गोटे, किशोर ताठे, रामदास गोटे, अशोक रासे, दत्ता ताठे, सुदाम ताठे, सदाशिव ढवळे, ढेंगळी पिंपळगाव : केशव सोळंके, नारायण कवटे, विष्णू मगर, प्रल्हाद कोरडे, देउळगाव गात : शिवाजी कदम

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!