Khandoba Yatra : सेलूतील श्री खंडोबा देवस्थानाचा कायापालट होणार; माजी आमदार लहाने यांच्या पुढाकाराने दीड कोटींचा निधी
तीस लाख रुपये खर्चाच्या देवस्थानच्या संरक्षक भिंत बांधकाम व सुशोभीकरणाचे भूमिपूजन
पाठीशी दैवी शक्ती असेल तर निश्चितच यश प्राप्ती होते.याचा प्रत्यय आपल्याला खंडोबा मंदिरच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करतांना आल्याचे प्रतिपादन माजी आमदार लहाने यांनी या वेळी बोलताना केले. विश्वंभर दीक्षित यांनी पौरोहित्य केले. प्रारंभी मल्हारी म्हाळसाकांत प्रतिमेचे पूजन झाले.
सेलू येथील शाहूनगर भागातील श्री खंडोबा मंदिरातही सकाळपासूनच भाविकांची गर्दी होती. सकाळी अभिषेक, महापूजा, महाप्रसाद झाला. विविध विकासकामांचे भूमिपूजन झाले. माजी आमदार हरिभाऊ लहाने, हेमंतराव आडळकर, जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, अशोक वाडकर, संतोष कुलकर्णी, अविनाश शेरे, बंडू देवधर, पांडुरंग कावळे, विष्णूपंत शेरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सायंकाळी वारुकरी हा पारंपरिक कार्यक्रम, भजन झाले. शकुंतला वाघे, आशा फरांडे, अशोक फरांडे, अमोल फरांडे, विठ्ठल गायकवाड आदींंसह शाहूनगरातील नागरिकांनी पुढाकार घेतला.
सेलू जि.परभणी : सेलू् शहरातील प्राचीन परंतु विकासापासून दुर्लक्षित राहिलेल्या शाहूनगरातील श्री खंडोबा मंदिर देवस्थानाचा कायापालट होणार आहे. शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या पुढाकाराने विविध योजनेअंतर्गत देवस्थानच्या विकासासाठी तब्बल दीड कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तीस लाख रुपये खर्चून देवस्थानच्या संरक्षक भिंत (Compound Wall) बांधकामाचे व सुशोभीकरणाचे भूमिपूजन सोमवारी, १८ डिसेंबर रोजी झाले. अध्यक्षस्थानी साईबाबा बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार हरिभाऊ लहाने यांची उपस्थिती होती. उद्योजक जयप्रकाश बिहाणी,नंदकिशोर बाहेती, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, संतोष कुलकर्णी, अशोक वाडकर, विष्णुपंत शेरे, खंडोबा मंदिर देवस्थानचे पुजारी अमोल वाघे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
हरिभाऊ लहाने म्हणाले की, जी प्राचीन मंदिरे दुर्लक्षित आहेत. तसेच जो भाग विकासात्मक कामापासून दूर राहिलेला आहे. याकडे आपण लक्ष देत आहोत. खंडोबा मंदिराच्या विकासाचे खरे प्रोत्साहन प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी व संतोष कुलकर्णी यांनीच दिले. केवळ तीन महिन्यातच या प्रयत्नाला यश आले. कामाचा शुभारंभ झाला. प्रास्ताविकात प्रा. नागेश कान्हेकर यांनी स्पष्ट केले, की भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मंदिर गेल्या कित्येक वर्षांपासून विकासापासून वंचित राहिले होते. माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी पाठपुरावा करून या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी जवळपास दीड कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. यामुळे भाविकांतून आभार व्यक्त केले जात आहेत.
प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी व जयप्रकाश बिहाणी यांनी देखील दुर्लक्षित असलेल्या मंदिराकडे लक्ष देऊन निधी उपलब्ध केल्या बद्दल लहाने यांचे अभिनंदन केले. शहरात असलेल्या अशा प्राचीन मंदिराचा विकास होणे गरजेचे असतांना नवीन मंदिरे उभारली जात आहेत. परंतु अशा प्राचीन व दुर्लक्षित असलेल्या मंदिराचा कायापालट होणे अत्यंत गरजेचे असल्याचे यावेळी स्पष्ट केले. अध्यक्षीय समारोपात हेमंत आडळकर यांनी नमूद केले, की प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी व संतोष कुलकर्णी यांच्या सोबत येऊन जेंव्हा खंडोबा मंदिराला भेट दिली. त्यावेळी घाणीचे साम्राज्य व पावित्र्य भंग होत असल्याची कल्पना आली. या मंदिराचा विकास खऱ्या अर्थाने हरिभाऊ लहानेच करू शकतात हे त्यांना आपण सांगितले व लगेच हा प्रस्ताव आम्ही लहाने यांच्यासमोर मांडला व अवघ्या तीन महिन्यातच या कामाला मूर्त स्वरूप आले. सूत्रसंचालन प्रा.महेश कुलकर्णी यांनी केले. संदीप लहाने यांनी आभार मानले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.