खंडोबा यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक; विविध कार्यक्रम उत्साहात

खंडोबा यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक; विविध कार्यक्रम उत्साहात

खंडोबा यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक; विविध कार्यक्रम उत्साहात

परभणी : शहराचे ग्रामदैवत श्रीखंडोबा यात्रेनिमित्त बाजार विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सोमवारी (१८ डिसेंंबर) सकाळी सात वाजता श्रींची महापूजा झाली. सायंकाळी पारंपरिक पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यात्रेनिमित्त २० डिसेंबररोजी एन.व्ही.एस. मराठवाडा हायस्कूलच्या मैदानावर जंगी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटक म्हणून खासदार संजय जाधव तर स्वागताध्यक्ष आमदार डॉ. राहुल पाटील, डॉ.विवेक नावंदर, श्री.अतुल सरोदे आदींची उपस्थिती राहणार आहे. सेलू् तालुक्यातील जवळा जिवाजी येथे श्री जिवाजी महाराज खंडोबा मंदिर संस्थानच्या वतीने यात्रेनिमित्त विविध पारंपरिक कार्यक्रम आयोजिण्यात आले. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ च्या जयघोषात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सेलू येथील शाहूनगर भागातील श्री खंडोबा मंदिरातही सकाळपासूनच भाविकांची गर्दी होती. सकाळी अभिषेक, महापूजा, महाप्रसाद झाला. विविध विकासकामांचे भूमिपूजन झाले. माजी आमदार हरिभाऊ लहाने, हेमंतराव आडळकर, जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, अशोक वाडकर, संतोष कुलकर्णी, अविनाश शेरे, बंडू देवधर, पांडुरंग कावळे, विष्णूपंत शेरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सायंकाळी वारुकरी हा पारंपरिक कार्यक्रम, भजन झाले. शकुंतला वाघे, आशा फरांडे, अशोक फरांडे, अमोल फरांडे, विठ्ठल गायकवाड आदींंसह शाहूनगरातील नागरिकांनी पुढाकार घेतला.


Panchmukhi Ganpati : सेलूतील श्री पंचमुखी गणपती प्रतिष्ठापनेची शोभायात्रा उत्साहात; ढोलताशा पथकाने वेधले लक्ष

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!