Mere Watan Ke Logo : मेरी संतान देश को समर्पित… वडिलांच्या भावना आल्या दाटून…
सेलूतील ब्रह्माकुमारी विद्यालयात लेफ्टनंट संगमेश मलवडे यांचा सत्कार
कैलास मलवडे म्हणाले, पालक म्हणून संगमेशवर डिफेन्समध्ये जाण्यासाठी कोणताही दबाब नव्हता. त्याचे दोन्ही मामा डिफेन्समध्ये आहेत. त्यांच्या युनिफॉर्मचे त्याला जबरदस्त आकर्षण होते. नववी, दहावी पासून त्याने एनडीएमध्ये जाण्यासाठी एसपीआयची तयारी सुरू केली. त्याला यश मिळाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र शासनाची एसपीआय ही खूप चांगली संस्था आहे. आत्तापर्यंत सहाशे अधिकारी या संस्थेने डिफेन्सला दिले आहेत.
सेलू जि.परभणी : उत्सुकतेने गौरव पदक उघडून पाहिले तेव्हा ‘मेरी संतान देश को समर्पित’ हे वाचतांना देशासाठी मुलगा समर्पित केल्याची खरीखुरी जाणीव झाली. आता आपला अधिकार सपंला. पहिला अधिकारी देशाचा, नंतर आई वडिलाचा अधिकार राहिल हेही उमगले. त्याच्या हातून देशाची उत्तमोत्तम सेवा घडो, अशी प्रार्थना लेफ्टनंचे संगमेशचे वडिल कैलास मलवडे यांनी येथील एका कार्यक्रमात केली, तेव्हा त्यांच्या भावना दाटून आल्या.
मंगळवारी, १९ डिसेंबररोजी सेलू येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने संगमेश मलवडे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यावेळी कैलास मलवडे बोलत होते. केंद्र सहसंचालिका ब्रह्माकुमारी सविता बहेन, ब्रह्माकुमारी सीमा बहेन, राधा बहेन, सारिका बहेन, शिवानी मलवडे यांची उपस्थिती होती. कैलास मलवडे म्हणाले, पालक म्हणून संगमेशवर डिफेन्समध्ये जाण्यासाठी कोणताही दबाब नव्हता. त्याचे दोन्ही मामा डिफेन्समध्ये आहेत. त्यांच्या युनिफॉर्मचे त्याला जबरदस्त आकर्षण होते. नववी, दहावी पासून त्याने एनडीएमध्ये जाण्यासाठी एसपीआयची तयारी सुरू केली. त्याला यश मिळाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र शासनाची एसपीआय ही खूप चांगली संस्था आहे. आत्तापर्यंत सहाशे अधिकारी या संस्थेने डिफेन्सला दिले आहेत. संपूर्ण विश्वाच्या सकारात्मक परिवर्तनासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या माध्यमातून हजारो समर्पित ब्रह्माकुमारींचे निरंतर कार्य अनमोल आहे, असे मत लेफ्टनंट संगमेश यांचे वडील कैलास मलवडे यांनी व्यक्त केले. स्वतःलाच जाणून घेण्याची आणि आत्मिक बळ वाढविण्याची गरज आहे, असे सविता बहेन म्हणाल्या. लष्करी प्रशिक्षणातील अनुभव सांगत, देशसेवा एक पवित्र व्रत म्हणून स्वीकारले आहे, असे संगमेश यांनी नमूद केले. कार्यक्रमाला ब्रह्माकुमारी परिवारातील माता, भाईंची उपस्थिती होती. सूत्रसंचालन राधा बहेन यांनी केले. सीमा बहेन यांनी आभार मानले.