Surabhi Mahotsav: श्रीराम प्रतिष्ठानचा सुरभि महोत्सव; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची सेलूकरांना मेजवानी

Surabhi Mahotsav: श्रीराम प्रतिष्ठानचा सुरभि महोत्सव; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची सेलूकरांना मेजवानी

मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती विविध कार्यक्रम, उपस्थित राहण्याचे आवाहन

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अपूर्व संधी देणारा श्रीराम प्रतिष्ठानच्या सुरभि महोत्स्व २४ डिसेंबरपासून सूरू होत आहे. विविध कार्यक्रम मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आहेत. सेलूकरांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे.नागरिकांनी, पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तथा सुरभि महोत्सवाचे आयोजक डॉ.संजय रोडगे यांनी केले आहे.

Surabhi Mahotsav: श्रीराम प्रतिष्ठानचा सुरभि महोत्सव; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची सेलूकरांना मेजवानी

सेलू जि.परभणी : येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभि महोत्सवाचे आयोजन २४ ते २९ डिसेंबर कालावधीत विद्याविहार संकुलामध्ये आयोजन करण्यात आले आहे. रविवारी स्पोर्ट्स-डे निमित्ताने घटक संस्थेतील सर्व शाळाच्या विद्यार्थ्यांचे संचालन, लेझीम,अरेबिक्स, मनोरे आदी विविध क्रीडा प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. साई नाट्य मंदिरात २५ व २६ डिसेंबरला वैयक्तिक नृत्य स्पर्धा, २९ डिसेंबरला क्युरिअस कीड्स, फिनकीडस व प्रॉस्परस पब्लिक स्कूलचा “ फोक डान्स ऑफ इंडिया ” कार्यक्रम आहे, तर २७ डिसेंबर रोजी प्रिन्स इंग्लिश स्कुल “ ट्रान्झिशन : असं चेंज इन वर्ल्ड ” यावर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रम आहे. २८ डिसेंबर रोजी वेळ सायंकाळी साडेपाच वाजता जिज्ञासा बालविहार व ज्ञानतीर्थ विद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम “ रंग मराठी मातीचा ” तसेच शिवपुत्र संभाजी महानाट्य या नाटिकेचे सादरीकरण आहे. प्रिन्स आदिवासी प्रकल्प व समाज कल्याण विभागांतर्गत २९ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रम “ महाराष्ट्राची लोकधारा ” आहे. तर सायंकाळी पाच वाजता अपूर्वा पॉलीटेक्निक, आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, डी.एड, बीएड सांस्कृतिक कार्यक्रम आहे.

महोत्सवाअंतर्गत २६ ते २९ डिसेंबर कालावधीत आनंद मेळावा आहे. २७ ते २९ डिसेंबरपर्यंत छंद सम्राट बहुउद्देशीय संस्था, नागपुर प्रस्तुत ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहाचे प्रदर्शन आहे. विविध देशातील नोटा संग्रह, युनिक शंख व शिंपले संग्रह, विदेशी माचीस व नाणी संग्रह, इतिहासकालीन कोर्ट स्टॅम्प, शस्त्र संग्राहक,अद्भुत मायक्रो आर्ट वर्क, कला, आटोग्राफसोबत फोटोग्राफ संग्रह, मिनियचर प्लेन मॉडेल संग्रह, अपसाईड डाऊन रायटिंग कला, ऐंटिक ओरिओगामी वस्तु संग्रह आदींचा यामध्ये समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना अपूर्व संधी देणारा श्रीराम प्रतिष्ठानच्या सुरभि महोत्स्व २४ डिसेंबरपासून सूरू होत आहे. विविध कार्यक्रम मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आहेत. सेलूकरांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे.नागरिकांनी, पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तथा सुरभि महोत्सवाचे आयोजक डॉ.संजय रोडगे यांनी केले आहे.


श्री केशवराज बाबासाहेब महाराजांचा यात्रा महोत्सवात भाविकांचा उत्साह

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!