Shri Keshavraj Babasaheb Maharaj : सेलूतील यात्रेनिमित्त सांस्कृतिक महोत्सव गुरूवारपासून ; दीपस्तंभ प्रतिष्ठानचा उपक्रम
सेलूच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणार्या या महोत्सवातील विविध कार्यक्रमांना महिला, नागरिक व रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले आहे.
सेलू जि.परभणी : संत श्री साईबाबांचे सद्गुरू व सेलूचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराजांच्या यात्रेनिमित्त आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पुढाकाराने दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवारी व शुक्रवारी (२८,२९ डिसेंबर) सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
नूतन रोडवरील जिल्हा परिषद केंद्रीय प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी सहा वाजता हा महोत्सव होत आहे. गुरुवारी,२८ डिसेंबर रोजी ‘विनोदी चांडाळ चौकडीच्या करामती’ हा कार्यक्रम आहे, तर शुक्रवारी केशव महाराज उखळीकर यांचे कीर्तन आहे. महोत्सवासाठी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.दत्तराव कदम, शंकर भोंडवे, कपिल फुलारी, गणेश काटकर, बाळू काजळे, सतीश धानोरकर, अशोक अंभोरे आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत. सेलूच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणार्या या महोत्सवातील विविध कार्यक्रमांना महिला, नागरिक व रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक आमदार मेघना साकोरे यांनी केले आहे.
श्री केशवराज बाबासाहेबांच्या यात्रा महोत्सवाला उत्साहात सुरूवात