Surabhi Mahotsav : ऐतिहासिक वस्तू संग्रह प्रदर्शनाचे उद्घाटन; दोन दिवस सेलूकरांना अपूर्व संधी
सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठानाच्या सुरभी महोत्सव अंतर्गत श्रीराम प्रतिष्ठान व छंद सम्राट बहुउद्देशीय संस्था नागपूर आयोजित ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहाचे प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी, २७ डिसेंबर रोजी संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते रवळगाव रस्त्यावरील विद्याविहार संकुलामध्ये झाले. या निमित्ताने ऐतिहासिक वस्तू संग्रह पाहण्याची अपूर्व संधी सेलूकरांना मिळाली आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.रोडगे यांनी या वेळी केले.
उद्घाटनाप्रसंगी मुख्य समन्वयक दिलीप डाहाके, सुनील रेड्डी श्री.गणेश डुमरे, मुस्तफा ए.एच.शौक, फत्तुजी सोनवाणे, रंजना कळंबे, सुबीर कुमार दासगुप्ता, रुपकिशोर कनोजिया, बाजीप्रताप पाटील अभिषेक रुद्रावार, प्रशासकीय अधिकारी महादेव साबळे, डॉ.राम रोडगे बीएड कॉलेजच्या प्राचार्य डॉ.नीलिमा सिंह, डॉ. राम रोडगे डीएड कॉलेजच्या प्राचार्य डॉ.मीनाक्षी रत्नपारखी, अपूर्वा पॉलीटेक्निकचे प्राचार्य प्रा.अशोक बोडके, आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य प्रा.अक्षय बन, प्रा.बबन सोनवणे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक विठ्ठल सरकटे यांनी केले.
या ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहाच्या प्रदर्शनामध्ये विविध देशातील नोटा, युनिक शंख शिंपले, विदेशी माचिस व नाणी, इतिहासातील कोर्ट स्टॅम्प, इतिहासातील शस्त्रसंग्रह, अद्भुत मायक्रो आर्ट वर्क, कला, आटोग्राफ सोबत फोटोग्राफ संग्रह, मिनियचर प्लेन मॉडल संग्रह, अपसाईड डाऊन रायटिंग कला, ऍटिक ओरिओगामी वस्तू संग्रह आदी पाहण्यासाठी मिळणार आहे. सेलू शहरातील विद्यार्थी व पालक तसेच नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे डॉ.संजय रोडगे यांनी केले आहे.