Surabhi Mahotsav : सांस्कृतिक कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद; सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानचा सुरभी महोत्सव

Surabhi Mahotsav : सांस्कृतिक कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद; सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानचा सुरभी महोत्सव

Surabhi Mahotsav : सांस्कृतिक कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फूर्त दाद; सेलूतील श्रीराम प्रतिष्ठानचा सुरभी महोत्सव

सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभी महोत्सवांतर्गत २६ डिसेंबर रोजी सायंकाळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम विद्या विहार संकुल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सनरो एज्युकेअर क्युरियस किड्स, फिन किड्स व प्रॉस्परस पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या समूह नृत्यांना रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या प्रसंगी आयोजक तथा संस्थेचे संस्थापक डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, डॉ.अपूर्वा रोडगे, प्रफुल्ल बिनायके, मदने कृउबासचे संचालक अनिल पवार, केशव सोळंके, डॉ.अजय बरसाले, श्रीवल्लभ लोया, जयसिंग शेळके, अशोक पटवारी, पत्रकार नारायण पाटील, राम सोनवणे, सोनाली महाजन, सुरेश नखाते, मन्मथ क्षीरसागर, निषा चंदेल आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने झाली. क्युरियस किड्स, फिन किड्स व प्रॉस्परस पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम नृत्य सादर केले. प्रॉस्परस पब्लिक स्कूलने फोक डान्स या थिमनुसार विविध राज्यांचे लोकनृत्य यांची झलक दाखवली. फिन किड्स क्यूरियस किड्स च्या चिमुकल्यांच्या नृत्यांनी लक्ष वेधले. याप्रसंगी डॉ.रोडगे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. डॉ. प्रताप काळे यांनी उद्घाटनपर मार्गदर्शन केले. सोनाली महाजन,ज्ञनिशा चंदेल यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी पी.पी.एस.प्रिन्स पुरस्कार आयुष पवार, तर प्रिन्सेस पुरस्काराने संचिता लहाने या विद्यार्थिनीला गौरविण्यात आले. उत्कृष्ट पालक मनीषा कदम, योगेश टेंभरे, उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून फिन किड्स – परिक्षीत बोराडे, हरिप्रिया जिंजाल, विषय तज्ज्ञ रिया टेंभरे, बालाजी राऊत, कार्तिक शिंदे, शिष्यवृत्ती पात्र प्रांजली जाधव यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन सारिका पाटील यांनी केले, तर आभार सावंत यांनी मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!