Surabhi Mahotsav : पालकांनो, मुलांसाठी नियोजनबद्ध वेळ द्या :अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे
सुरभी महोत्सवातील विविध स्पर्धा तसेच पुरस्काराचे वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम रंगला
सेलू जि.परभणी : कोव्हिडनंतर शिक्षणाचे स्वरूप आणि पद्धतीमध्ये वेगाने आमुलाग्र बदल झाला आहे. स्पर्धा प्रचंड आहे. विद्यार्थ्यांचा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा पाया पक्का असणे अत्यंत गरजेचे आहे. या शिवाय मुलांचा सर्वांगीण विकास आणि उज्ज्वल भवितव्यासाठी पालकांनी थेट आणि नियोजनबद्ध वेळ मुलांना देणेही महत्त्वाचे आहे, असे मत परभणीचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांनी व्यक्त केले.
सेलू् येथील श्रीराम प्रतिष्ठानाच्या सुरभी महोत्सवातील विविध स्पर्धा तसेच पुरस्काराचे वितरण मंगळवारी, २६ डिसेंबर रोजी सायंकाळी झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे होते. सचिव डॉ.सविता रोडगे, डॉ.अपूर्वा रोडगे, प्रफुल्ल बिनायके, मदने, कृउबासचे संचालक अनिल पवार, केशव सोळंके, डॉ.अजय बरसाले, श्रीवल्लभ लोया, जयसिंग शेळके, अशोक पटवारी, पत्रकार नारायण पाटील, राम सोनवणे, सोनाली महाजन, सुरेश नखाते, मन्मथ क्षीरसागर, निषा चंदेल आदी मान्यवरांची उपस्थिती होती. श्रीराम प्रतिष्ठानच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करून डॉ.काळे म्हणाले की; डिजिटलायझेनच्या बदलत्या काळात पाल्याला सोयीसुविधा देतांना, बदलत्या शैक्षणिक प्रवाहाबरोबर राहाणे गरजेचे आहे. शिक्षणासोबतच खेळांमध्येसुद्धा करिअरच्या भरपूर संधी आहेत. आवड पाहून तशी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, असेही काळे म्हणाले. या वेळी सनरो एज्युकेअर क्युरिअस, फिन किड्स व प्रॉस्परस पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. डॉ.रोडगे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी आयुष पवार, संचिता लहाने, मनीषा कदम, योगेश टेंभरे, परीक्षीत बोराडे, हरिप्रिया जिंजाल, रिया टेंभरे, बालाजी राऊत, कार्तिक शिंदे, पांजली जाधव आदींचा विविध पुरस्काराने गौरव करण्यात आला. प्रास्ताविक प्रगती क्षीरसागर, तर सूत्रसंचालन सारिका पाटील यांनी केले.
श्रीराम प्रतिष्ठानच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करून डॉ.काळे म्हणाले की; डिजिटलायझेनच्या बदलत्या काळात पाल्याला सोयीसुविधा देतांना, बदलत्या शैक्षणिक प्रवाहाबरोबर राहाणे गरजेचे आहे. शिक्षणासोबतच खेळांमध्येसुद्धा करिअरच्या भरपूर संधी आहेत. आवड पाहून तशी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, असेही अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे म्हणाले.