Sports-नितीन लहाने स्मृती चषक : सेलूमध्ये १५ जानेवारीपासून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा 

Sports-नितीन लहाने स्मृती चषक : सेलूमध्ये १५ जानेवारीपासून राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नितीन क्रीडा मंडळाचा उपक्रम

सेलू जि.परभणी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येथील नितीन व्यायाम शाळा, कला, क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळाच्या वतीने निमंत्रितांच्या राज्यस्तरीय स्व.नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा  आयोजिण्यात आल्या आहेत. १५ ते २३ जानेवारी या कालावधीत नूतन महाविद्यालयाच्या क्रीडा मैदानावर या स्पर्धा होत आहेत. स्पर्धेचे हे २४ वे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी ही माहिती दिली. स्पर्धेच्या नियोजना संदर्भात माजी आमदार लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी, ३० डिसेंबररोजी बैठक झाली. सचिव माजी नगरसेवक संदीप लहाने, गणेश माळवे, अविनाश शेरे, पांडुरंग कावळे, नामदेवआप्पा डख, बंडू देवधर, बाबा काटकर, राजेश राठोड, मोहन बोराडे, खाजाभाई, हरिभाऊ काळे आदींसह खेळाडू व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन गेल्या २३ वर्षापासून केले जाते. देशातील तसेच राज्यातील नामवंत रणजी तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये हजेरी लावलेली आहे.

…या नामांकित संघांना निमंत्रण

यंदा छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव, जालना, परभणी, मालेगाव आदी शहरातील नामवंत संघांना निमंत्रित करण्यात आले आहे. विजेत्या संघाला स्मृती चषकासह प्रथम पारितोषिक एक लाख रुपये रोख, द्वितीय पारितोषिक ७१ हजार रुपये देऊन गौरविण्या येणार आहे. मालिकावीर पुरस्कार २५ हजार रुपये रोख व चषक आह. सामना वीर पुरस्कारही देण्यात येणार आहे. खेळाडूंची राहण्याची व निवासाची व्यवस्था संयोजन समितीच्या वतीने करण्यात आली आहे. प्रत्येक सामना २० षटकांचा असणार आहे, असे माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी बैठकीत सांगितले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!