सीसीआयच्या कापूस खरेदीतील शेतकर्यांच्या अडचणी दूर करा : सेलू तालुका दबाव गटाची मागणी
सेलू /परभणी : सीसीआयच्या कापूस खरेदीतील शेतकर्यांच्या अडचणी दूर कराव्यात अशी सेलू तालुका दबाव गटाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदार दिनेश झांपले यांना सोमवारी निवेदन देण्यात आले. सीसीआयने कापूस खरेदी सुरु केलेली आहे. खुल्या बाजारात सध्या रुपये ६ हजार ८०० प्रतिक्विंटल दराने खरेदी सुरु आहे. सीसीआय ७ हजार २० रुपये प्रमाणे खरेदी करीत आहे. अनेक शेतकर्यांनी खरीप पिकांची ई-पिक नोंदणी केलेली नाही. त्यामुळे सीसीआय त्यांचा कापूस खरेदी करीत नाही. २०२३-२४ चा पिक पेरा नोंद नसल्याने शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे. आता ई.पिक नोंदणी बंद आहे. आधीच पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्यामध्ये बाजारात शेतमालाला कापूस, सोयाबीनला अत्यंत कमी भाव आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर दबाव गटाचे समन्वयक ॲड.श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, इसाक पटेल, विलास रोडगे, ॲड.टी.ए. चव्हाण, गुलाब पौळ, सतीश काकडे, रामचंद्र कांबळे, लक्ष्मण प्रधान, अजित मंडलिक, मुकुंद टेकाळे, ॲड.देवराव दळवे, राजेंद्र केवारे, नारायण पवार, ॲड.योगेश सूर्यवंशी, ॲड.उमेश काष्टे, रौफभाई, आबासाहेब भुजबळ, गणेश सोळंके, महादेव, लोंढे, उद्भव सोळंके, दत्तराव कांगणे, भारत खंदळे, रामचंद्र आघाव, चिंतामण दौड, लिंबाजी कलाल, मतिन दादामियाँ, लिंबाजी कलाल, अशोक कलाल, उत्तम गवारे, जलालभाई, दिलीप शेवाळे, ॲड.पांडुरंग आवटी, शिवाजी खेडकर, परमेश्वर वीर दिलीप मगर, मुकुंद रेकाळे, गणेश मुंढे, चंद्रकांत चौधरी, सय्यद जलाल, गणपत मिटकरी, राजेंद्र गवारे,सोनू शेवाळे, डॉ. गणेश थोरे आदींच्या सह्या आहेत