IAS Meghana Kavalli : समस्यांकडे संधी म्हणून पाहा : मेघना कावली; सेलूतील नूतन कन्या प्रशालेच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन 

IAS Meghana Kavalli : समस्यांकडे संधी म्हणून पाहा : मेघना कावली; सेलूतील नूतन कन्या प्रशालेच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन 

सेलू/परभणी : शिक्षणात आयुष्य बदलण्याची अलौकिक ताकद आहे. सातत्याने शिक्षण घेत राहा. समस्यांशी दोन हात करीत समस्यांकडे संधी म्हणून पाहाणे गरजेचे आहे, ” असे मत सेलूच्या सहायक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी बुधवारी, तीन जानेवारी रोजी केले.

सेलू येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला आणि तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभागाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मेघना कावली बोलत होत्या. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर होते. प्रभारी मुख्याध्यापक रोहिदास मोगल , दतराव घोगरे, सांस्कृतिक विभागप्रमुख भालचंद्र गांजापुरकर , क्रीडा विभाग प्रमुख संगीता खराबे, नृत्यदिग्दर्शक सतीश धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि रंगदेवता नटराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. संस्कृती सावजीने स्वागत गीत गायीले. याप्रसंगी मेघना कावली यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य कोठेकर यांनी शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने विद्यार्थींनी सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर ओवी, नृत्य सादर करून अभिवादन केले. सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले, आभार भालचंद्र गांजापूरकर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शशिकांत देशपांडे, नागेश देशमुख, सुनील मोगल, रेणुका आंबेकर, सुषमा दामा, सीमा सुकते, वैशाली चव्हाण, सतीश कुंडीकर, सुहास देऊळगावकर, कैलास मलवडे, विनोद शिंदे, बाबासाहेब थोरे, किशोर ढोके यांनी परिश्रम घेतले. 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!