SPL Cricket : सेलू प्रीमियर लीगचे उद्घाटन; पाच दिवस रंगणार क्रिकेटचे सामने
सेलू/परभणी : सेलू् येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित तिसऱ्या सेलू प्रीमियर लीगचे उद्घाटन बुधवारी, ३ जानेवारी रोजी झाले. साईराज बोराडे मित्रमंडळाच्या वतीने या पाच दिवसीय स्पर्धा आयोजिण्यात आल्या आहेत. उद्घाटनप्रसंगी प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गटकळ करिअर ॲकडमी व प्रिन्स वारियर्स संघामध्ये पहिला सामना झाला. या वेळी मुकेशराव बोराडे, माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, प्रभाकर सुरवसे, साईराज बोराडे, अमर सुरवसे, मारोती चव्हाण, मिलिंद सावंत, राजेंद्र पवार, प्रसाद महाराज काष्टे, सहायक पोलिस निरीक्षक अशोक जटाळ, गौतम धापसे, शेख दिलावर, व्यंकटेश चव्हाण, रमेश दौड, सचिन कोरडे, विठ्ठल काळबांडे, राजेंद्र केवारे, लक्ष्मण बुरेवार आदींची उपस्थिती होती. धावते समालोचन इरफान पठाण, यासेर शेख करीत आहेत. गुणलेखक अभिजित चव्हाण. ७ जानेवारीला अंतिम सामना आहे. विजेत्यांना रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.