स्वामी विवेकानंद ग्रंथालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात; आहेर बोरगावमध्ये कार्यक्रम
सेलू/परभणी : आहेर बोरगाव येथील स्वामी विवेकानंद ग्रंथालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बुधवारी साजरी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुकुंद राजेंद्र लहाने होते. सावित्रीमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नितीन माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक पांडुरंग लाडाणे होते. स्वामी विवेकानंद ग्रंथालयाचे सचिव शिवाजी काळे तसेच संतोष तायडे, गंगाधर आवचार, कैलास चोखनफळे, कैलास पुंगळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्रंथालयाचे लिपिक मोगरे यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी उपस्थित होते.