सावित्रीबाई फुले जयंती : ‘जिजामाता’मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप; सेलूत अभिवादन कार्यक्रम 

सावित्रीबाई फुले जयंती : ‘जिजामाता’मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप; सेलूत अभिवादन कार्यक्रम 

विवेकानंद शाळा, उपजिल्हा रुग्णालयात अभिवादन कार्यक्रम

सावित्रीबाई फुले जयंती : 'जिजामाता'मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप; सेलूत अभिवादन कार्यक्रम 

सेलू : जिजामाता बाल विद्या मंदिर येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. अध्यक्ष म्हणून संस्था सचिव दिगंबरराव मुळे, तर प्रमुख अतिथी म्हणून मधुकरनाना पौळ, दीपक निकाळजे, पुंजाराम निर्वळ यांची उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुंजाराम निर्मळ यांनी सावित्रीची लेक म्हणून पायल धापसे हीचे पुष्पहार घालून पूजन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक रवींद्र पाठक यांनी केले. पौळ, निर्वळ यांनी मनोगत व्यक्त केले. खाऊवाटपाने समारोप झाला.

सावित्रीबाई फुले जयंती : 'जिजामाता'मध्ये शैक्षणिक साहित्य वाटप; सेलूत अभिवादन कार्यक्रम 

उपजिल्हा रुग्णालयात अभिवादन 

सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या कार्यकतृत्वाला उजाळा देण्यात आला. याप्रसंगी क्रांती फाउंडेशनच्या अध्यक्षा पोर्णिमा जोहिरे, निर्मला लिपणे, सहायक अधिसेविका एस.बी.राठोड, परिसेविका घाडमोडे, आरोग्य सेविका आशा ताम्बुरे, रोडे, खाटोकर, प्रकाश खरात, विनोद राठोड आदींची उपस्थिती होती

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!