सावित्रीमाईंच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी वेधले लक्ष; सेलूतील प्रॉस्परस स्कूलचा उपक्रम
सेलू : श्रीराम प्रतिष्ठानच्या प्रॉस्परस पब्लिक स्कूल तेथे ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी सावित्रीमाईंच्या वेशभूषेतील फिनकिडस् चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या हस्ते सावित्रीमाईंच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. प्राचार्या प्रगती क्षीरसागर व शिक्षकांची उपस्थिती होती. यानिमित्ताने फिनकिड्स मधील विद्यार्थ्यांनी सावित्रीमाई फुले यांची वेशभूषा साकारली. महिलांच्या आयुष्यात शिक्षणाची कधी न दिसणारी ज्योत प्रज्वलित करणार्या ज्ञानाई सावित्रीमाई फुले यांचे कार्य क्रांतीकारी आहे, अशा शब्दांत डॉ.रोडगे यांनी अभिवादन केले.