भाजपा सेलू शहराध्यक्षपदी अशोक अंभोरे यांची निवड

भाजपा सेलू शहराध्यक्षपदी अशोक अंभोरे यांची निवड

सेलू : शहरातील सामाजिक कार्यकर्ते अशोक अंभोरे यांची भारतीय जनता पार्टीच्या सेलू शहराध्यक्षपदी मंगळवारी परभणी येथील मेळाव्यात निवड करण्यात आली. यावेळी भाजपाचे नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, डॉ.कदम यांची उपस्थिती होती. मागील अनेक वर्षापासून केवळ मागासवर्गीय समाजाचा राजकिय पक्षांनी केवळ मतदानापुरताच वापर केला होता. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या वतीने समाजाला न्याय देवून अशोक अंभोरे यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.ज्ञया निवडीबद्दल आमदार मेघना बोर्डीकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस अर्जुन बोरूळ तालुकाध्यक्ष ॲड.दत्तराव कदम, युवा तालुकाध्यक्ष गणेशराव काटकर ॲड.संजय लोया, पंजाबराव पौळ शिवाजीराव खेडकर, मयूर वाघ, ॲड.रामेश्वर शेवाळे, रामपाल तिवारी, बाळासाहेब काजळे, गोविंद शर्मा, विठ्ठल कोकर, कपिल फुलारी, अभय महाजन, गणेश सवणे, प्रकाश शेरे, प्रशांत ठाकूर, सुनील चव्हाण, राजू रणसिंगे, राजू सोळंके, अमोल भोसले लालू पठाण, सय्यद नियाजुद्दीन, बद्रुद्दिन अन्सारी यांच्यासह सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!