Shree Kalika Devi : सेलूतील श्रीकालिंकादेवीचा वार्षिकोत्सव सोहळा सोमवारी; विविध कार्यक्रमांचे‌ आयोजन

Shree Kalika Devi : सेलूतील श्रीकालिंकादेवीचा वार्षिकोत्सव सोहळा सोमवारी; विविध कार्यक्रमांचे‌ आयोजन

महाभिषेक, महापूजा, महाप्रसाद, विवाह सोहळा आदी भरगच्च कार्यक्रम; मान्यवरांची उपस्थिती 

सेलू, दि ३ जानेवारी : सोमवंशी क्षत्रिय कासार समाजाची कुलदेवता श्री कालिंका देवी मंदिर संस्थानच्या वतीने सोमवारी, ८ जानेवारी रोजी श्री कालिंका देवीच्या प्रतिष्ठापनेच्या २६ व्या वार्षिकोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थानचे अध्यक्ष अशोकराव कासार यांनी ही माहिती दिली.

शहरातील विद्यानगर भागातील कालिंका देवी मंदिर परिसरात कार्यक्रम होत आहेत. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. वार्षिक उत्सवानिमित्त सोमवारी सकाळी आठ वाजता श्री कालिंकामातेला महाभिषेक, महापूजा, दुपारी महाआरती होणार आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात कासार समाज मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष शरद भांडेकर (माजलगाव), अरुणराव वेळापुरे (माजलगाव) यांचा सत्कार संस्थानच्या वतीने करण्यात येणार आहे. उत्सवातील महाप्रसादाचे यजमान बायनाबाई आहेर, दामोधर, महावीर, फुलचंद आहेर (हैदराबाद) व रामप्रसाद तांबट (सेलू) आहेत, तर चहापान व अल्पोपहार मुंजाभाऊ शेटे, मुकुंदराव लोखंडे, प्रशांत शेटे, चंद्रकांत सासवडे, जलसेवा जीवन खरावणे, तसेच मोफत स्वयंपाक सेवा शिवाजीराव (बाबा) शिनगारे यांच्यावतीने आहे. दरम्यान, वार्षिक उत्सवामध्ये चि‌.दत्तात्रय व चि.सौ.कां पूजा यांचा विवाह होत आहे. वार्षिक उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. वार्षिक उत्सवासाठी कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष अशोकराव माणिकराव कासार, उपाध्यक्ष रामप्रसाद वराडे, अशोककुमार वानरे, सचिव गजानन हेलसकर, सहसचिव अनंतकुमार विश्वंभर, शंकरराव हेलसकर, गोपाळराव सासवडे, प्रभाकर खरावणे, बाबासाहेब हेलसकर, सुनिताताई बाळकृष्ण हेलसकर, माधवराव वानरे, अरुण गोरे, धर्मकुमार वानरे, जीवन खरावणे, गोपाळराव हेलसकर, दिलीप कुंभकर्ण, मीराताई हलगे, शोभाताई वानरे आदींंसह सेलू्तील कासार समाज बांधव पुढाकार घेत आहेत.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!