Know @ Banking : मानवतच्या साईबाबा बँकेत रमले विद्यार्थी; बॅंकिंग व्यवहारांसह कामकाज घेतले जाणून

Know @ Banking : मानवतच्या साईबाबा बँकेत रमले विद्यार्थी; बॅंकिंग व्यवहारांसह कामकाज घेतले जाणून

परभणी : विकसित तंत्रज्ञानामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये दिवसेंदिवस झपाट्याने बदल होत आहेत. या पार्श्वभूमीवर बॅंकिंग व्यवहारांसह कामकाज जाणून घेण्याच्या उद्देशाने मानवत येथील साईबाबा नागरी सहकारी बँकेच्या शाखेत गुरुवारी, चार जानेवारी रोजी विद्यार्थी चांगलेच रमले होते‌.
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था, व्यक्तीमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जैन कॉम्पुटर्सच्यावतीने ‘ओळख बँक कामकाजाची ‘क्षेत्रभेट गुरुवारी आयोजिण्यात आली होती. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मनमोकळा संवाद साधला. ठेवीदारांचा पैसा सुरक्षित ठेवून, त्यांना योग्य परतावा देणे. विश्वास दृढ करीत पात्र लोकांना वित्तपुरवठ्याद्वारे अर्थकारणाला चालना देणे आदी प्रमुख कामे बँकेमार्फत होतात. बँकिंग हा अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधारस्तंभ असून, भरभक्कम आर्थिक स्थिती व चांगला कारभार करणाऱ्या बँका राष्ट्राच्या आर्थिक संपन्नतेत योगदान देत असतात, असे लाडाणे यांनी सांगितले. कोअर बँकिंग प्रणाली, नेट बँकिंग, डिजीटल, मोबाईल बँकिंग आदींसह विभागांच्या कामकाज व सुविधांविषयी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. प्रत्येक नागरिकाला बॅंकिंग व्यवहारातील बदलांबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे, असे लाडाणे यांनी नमूद केले‌. तसेच संचालक मंडळ कामकाज, कर्ज प्रक्रिया, विविध सेवा, ऑडिट, सभासदांचे हक्क व लाभाबाबत शाखाधिकारी निसार पठाण यांनी माहिती दिली. या वेळी बँकेचे सुरू असलेले कामकाज, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या धावपळीचा अनुभव घेत, ठेवीदार व खातेदारांशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. निसार पठाण, जैन कॉम्पुटर्सचे संचालक उदय परभणकर, प्रवीण कदम, अशोक मगर, अजित लाडाणे, हेमंत करवलकर, गोकुळ पारखे, प्रिया पिंपळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!