आव्हाडांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध; सेलूत भाजपाचे ‘ जोडे मारो ‘आंदोलन
सेलू/परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीरामांबद्दल अपशब्द वापरून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याच्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी तीव्र निषेध करीत संताप व्यक्त केला.सेलूतील क्रांती चौकात आमदार आव्हाड यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदविला. आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चप्पल हार घालून संताप व्यक्त केला. या वेळी या वेळी तालुकाध्यक्ष ॲड.दत्तराव कदम, शहराध्यक्ष अशोक अंभोरे, ॲड.संजय लोया, महिला तालुकाध्यक्ष वनिता चाफेकर, बबिता ठाकूर, मोनिका देशमुख, मंगल मुसळे, अर्जुन बोरूळ, गणेश काटकर, कपिल फूलारी, भागवत दळवे, संजय भाग्यवंत, प्रकाश शेरे, बाळू काजळे, अभय महाजन, विश्वास राजवाडकर, मयूर वाघ, ॲड. रामेश्वर शेवाळे, ॲड.मुकुंद गजमल, विठ्ठल प्रकाश शेरे, प्रसाद खारकर, गोविंद शर्मा, अमोल भोसले, दत्ता पवार, सुनील चव्हाण, गणेश सवणे, राजू सोळंके, पप्पू शिंदे, अजित मोगल, रामविलास बाहेती, मुकुंद मोगल, रितेष लिपणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
परभणीमध्ये निदर्शने
आमदार आव्हाड यांच्यावर कठोर कारवाईची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. या प्रसंगी संपर्क प्रमुख माजी खासदार सुरेश जाधव, जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपा परभणी महानगरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात तीव्र निदर्शने करण्यात आली. आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, डॉ.सुभाष कदम, राजेश देशपांडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.