सेलूत अनेकांचा ‘राष्ट्रवादी’ मध्ये प्रवेश; माजी आमदार विजय भांबळे यांची उपस्थिती
परभणी : सेलू येथील राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयामध्ये शुक्रवारी, ५ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने ढेंगळी पिंपळगाव येथील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. माजी आमदार विजय भांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी माजी सभापती पुरुषोत्तम पावडे, सुधाकर रोकडे,आप्पासाहेब डख, प्रकाश मुळे, चंद्रकांत गाडेकर,कल्याणराव जोगदंड, कैलासराव मोगल, नानासाहेब बोबडे, शिवराम कदम, प्रभाकर सोळंके,मारोती वामनराव सोळंके,मारोती नाथाराव सोळंके,महादेव कवटे,बबन तिडके,रमेश मगर अशोक पवार,,आप्पासाहेब रोडगे, तुकाराम रोडगे आदींंसह कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी महादेव सोळंके, माऊली सोळंके, राहुल सोळंके, आनंद सोळंके, गोविंद सोळंके, बालाजी सोळंके, प्रल्हाद सोळंके, हनुमान साखरे, कैलास कवटे, पांडूरंग कवटे, आनंद सोळंके, माणीक डोंगरे, शेख मन्सुर, सुंदर काळे, शेख, मुस्तफा, संतोष पंडागळे, ऊध्दव पंडागळे, भारत पंडागळे, राजेश पंडागळे, बाबा पंडागळे, सुरेश मकासरे, मुंजाभाऊ मगर, लालाभाऊ पंडागळे आदींसह अनेकांचे भांबळे यांनी पक्षामध्ये स्वागत केले.