मराठा कुणबी प्रमाणपत्रांसाठीची अडवणूक थांबवा : सेलूच्या उपजिल्हाधिकार्यांना निवेदन
सेलू/परभणी : मराठा कुणबी प्रमाणपत्रांचे दाखले देण्यासाठी होणारी अडवणूक थांबविणे, नवीन नोंदी सापडण्यासाठी तपासणी करावी, अशी सेलू् तालुक्यातील मागणी सकल मराठा समाजाने उपजिल्हाधिकाऱ्यांकडे शुक्रवारी निवेदनाद्वारे केली.
राज्य शासनाने मराठा कुणबी दाखले देण्यासाठी कोणाचीही अडवणूक न करता तत्काळ द्यावेत अशा सूचना दिल्या होत्या, पण सेलूत असे होत असल्याचे पहावयास मिळत नाही. या दाखल्यांसाठी एक महिन्याच्यावर कालावधी लागत आहे. पूर्वी एवढा – वेळ लागत नव्हता. यामुळे लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. दाखले देण्यासाठी टाळाटाळ होत असून विविध कागदपत्रे व कारणे सांगून मराठा समाजाची अडवणूक केली जात आहे. एसडीएम कार्यालयात मराठा कुणबी दाखल्यांसाठी हेलपाटे मारून लोक मेटाकुटीला आले. मराठा समाजाची
अडवणून न करता कुणबी मराठा दाखले तत्काळ द्यावेत. तसेच तालुक्यातील काही मोजक्याच गावांतील मराठा कुणबी नोंदी सापडल्या. नवीन नोंदी सापडण्यासाठी हे प्रशासन उदासीन धोरण राबवत असल्याने समाज वंचित राहत आहे. नवीन नोंदीसाठी प्रयत्न करावेत. नसता कार्यालयासमोर मराठा समाजातर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला. यावेळी जयसिंग शेळके, अशोक ताठे, पांडुरंग कदम, महादेव खरात, रमेश शेळके, बाबासाहेब कदम, ज्ञानेश्वर फाटे, शरद मोगल, सखाराम डासाळकर, निशिकांत रोडगे, निळकंठ पवार, माणिक हावळे, अशोक गोरे, बापुराव डख, सुधाकर साखरे, गोविंद ताठे, मोहन ताठे, देविदास ताठे, प्रल्हाद थोंबाळ, कल्याण ताठे, शाम ताठे, नारायण ताठे, वैभव सोळंके आदी उपस्थित होते.