दर्पण दिन : विकासाभिमुख पत्रकारिता बळकट व्हावी : हेमंतराव आडळकर; सेलूतील साईबाबा बँकेतर्फे पत्रकारांचा सत्कार
पत्रकार संघटनांतर्फे विविध कार्यक्रम
सेलू/परभणी : लोकशाहीमध्ये पत्रकारितेचे स्थान अभेद्य आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची व्याप्ती वाढल्याने पत्रकारितेचे स्वरूप झपाट्याने बदलत आहेत. अशा स्थितीत विकासाभिमुख पत्रकारितेला बळकट करण्याचा प्रयत्न निरंतर सुरू ठेवणे गरजेचे आहे, असे मत साईबाबा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांनी व्यक्त केले.
दर्पण दिनानिमित्त साईबाबा नागरी सहकारी बँकेतर्फे शनिवारी पत्रकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यावेळी आडळकर बोलत होते. सेलू तालुक्यातील विविध प्रलंबित विकास प्रश्नांवर पत्रकारांनी आवाज उठवावा असे आडळकर यांनी नमूद केले. मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, दत्तराव आंधळे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. या वेळी उपस्थित पत्रकारांसह पुरस्कारप्राप्त पत्रकार शेख मोहसीन अहमद यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन निसार पठाण यांनी केले. संतोष हुगे यांनी आभार मानले.
पत्रकार संघटनांतर्फे विविध कार्यक्रम
दर्पण दिनानिमित्त सेलू तालुका मराठी पत्रकार संघ व व्हाईस ऑफ मिडिया संघटनेच्या वतीने लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रम झाला. मोहन बोराडे, अशोक अंभोरे, श्रीपाद कुलकर्णी, बाबासाहेब हेलसकर, डॉ.विलास मोरे, विलास शिंदे, शिवाजी आकात, प्रसाद खारकर, शंभू काकडे, बाळू काष्टे आदींची उपस्थिती होती. डिजीटल मीडिया संघटनेच्या कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार राम सोनवणे, अध्यक्ष किशोर कटारे, सतीश आकात, संदीप वरकड, नीरज लोया, गणेश सवणे उपस्थित होते.
सेलू तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने लोकमान्य टिळक व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. माजी आमदार हरिभाऊ लहाने, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी सभापती अशोक काकडे, लक्ष्मण बागल, अशोक अंभोरे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी काकडे सेवाभावी संस्थेतर्फे पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. लोकमान्य टिळक पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी पुढाकार घेऊन काम पूर्ण केले. याबद्दल माजी आमदार हरिभाऊ लहाने यांचा कांचन कोरडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अशोक अंभोरे, शेख मोहसीन यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मोहंमद इलियास यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. लक्ष्मण बागल यांनी आभार मानले. या वेळी पत्रकारांची मोठी उपस्थिती होती.