दर्पण दिन : सेलूतील विवेकानंद विद्यालयात वृत्तपत्र वाचनाचा उपक्रम

दर्पण दिन : सेलूतील विवेकानंद विद्यालयात वृत्तपत्र वाचनाचा उपक्रम

सेलू/ प्रतिनिधी : शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी वृत्तपत्र वाचन केले. स्वातंत्र्य चळवळीत ,सामाजिक बदलात वृत्तपत्राचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका वृत्तपत्र व पत्रकार बजावतात. शिक्षक विजय चौधरी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना जगाचे ज्ञान व्हावे ,आजूबाजूला काय चालले आहे याची माहिती मिळावी या हेतूने इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी वृत्तपत्र वाचन केले.तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांनी बातमी तयार करणे या उपक्रमात सहभागी नोंदविला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!