Bagless Saturday : रोडगे प्रिन्स इंग्लिश, फिनकिड्स स्कूलमध्ये चिमुकल्यांनी भरवला फळांचा बाजार; विविध उपक्रम उत्साहात

Bagless Saturday : रोडगे प्रिन्स इंग्लिश, फिनकिड्स स्कूलमध्ये चिमुकल्यांनी भरवला फळांचा बाजार; विविध उपक्रम उत्साहात

सेलू : श्रीराम प्रतिष्ठान सेलू संचलित एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा ‘ या अभियांतर्गत ‘बॅगलेस दिवस ‘ यामध्ये भाजीपाला बाजार , भाषण स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, किशोरवयीन मुलींना समुपदेशन इत्यादी कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, प्राचार्य कार्तिक रत्नाला, मीनाक्षी रत्नपारखे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. ‘भाजीपाला बाजार ‘ उपक्रमातून मुलांना व्यवहार ज्ञान प्राप्त व्हावे. भाज्यांची विक्री कसे करावे याचे व्यवहारिक ज्ञान मिळाले.  ‘आयुष्यातील माझी उद्दिष्टे आणि महत्वाकांक्षा ‘, ‘सोशल मीडिया एक शाप की वरदान ‘ या विषयावर  इंग्रजी भाषण स्पर्धा झाली. ‘हस्ताक्षर स्पर्धा’ मुलांच्या अक्षर सुधारणाच्या हेतूने त्यांना प्रेरणा मिळावी याकरिता घेण्यात आली. ‘किशोरवयीन मुलींना समुपदेशन ‘ या उपक्रमाव्दारे मुलींचे आरोग्य व स्वच्छतेसाठी डॉक्टर सविता रोडगे, रत्नपारखे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. मुलींच्या समस्या, मासिक पाळी, शारीरिक बदल, योगासन, आहार, स्वच्छता इत्यादींची माहिती दिली .सूत्रसंचालन कल्पना भाबट, आभार प्रदर्शन रीना ठाकूर यांनी केले.

फिनकिड्स स्कूलमध्ये चिमुकल्यांनी विविध फळांचे मार्केट भरवले. याप्रसंगी संस्थेचे डॉ.रामराव रोडगे , संस्थापक मा.डॉ.संजय रोडगे,सचिव डॉ.सविता रोडगे, कार्तिक रत्नाला मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात मान्यवरांनी चिमुकल्यांचे भरघोस कौतुक करून दररोजच्या आहारात फळांचा समावेश किती आवश्यक आहे हे मुलांना समजावून सांगितले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!