राष्ट्रीय बँकेमार्फत वेतन संघर्ष सन्मान सोहळा उत्साहात

राष्ट्रीय बँकेमार्फत वेतन संघर्ष सन्मान सोहळा उत्साहात

आमदार रत्नाकर गुट्टे, सूर्यकांत विश्वासराव, डाॅ.ज्ञानेश्वर भाले, सचिन देशमुख यांचा सत्कार 

परभणी : मराठवाडा शिक्षक संघाने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर परभणी जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँके मार्फत करण्याचा शासन आदेश मिळाल्याबद्दल आमदार रत्नाकर गुट्टे, सूर्यकांत विश्वासराव, पत्रकार डाॅ.ज्ञानेश्वर भाले, सचिन देशमुख यांच्यासह या संघर्षात भरीव योगदान देणार्‍यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने आदर्श विद्यालय येथे संघर्ष सन्मान सोहळा संपन्न झाला. अध्यक्षस्थानी सुर्यकांत हाके तर प्रमुख अतिथी म्हणून अनिल तोष्णीवाल, डाॅ.भगवान धुतमल, यु.आर.थोंबाळ, अजय गव्हाणे,बी.टी.सांगळे,विक्रम कदम, बी.एस.पुर्णे,महेश पाटील, गणेश शिंदे, समिऊल्ला खान, एम.पी.लोखंडे, व्यंकटराव चिलवरवार आदी मान्यवर उपस्थित होते. परभणीतील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मराठवाडा शिक्षक संघाचे परभणी जिल्हाध्यक्ष यशवंत मकरंद, सचिव निशांत हाके यांचा सत्कार सुनील ढवळे, रवि पंडित, प्रमोद अंभोरे, जयश्री पुंडगे, प्रितम खंदारे, विश्वजित वाघमारे, धनंजय बनकर, राहुल धबाले यांनी केला.

सत्काराला उत्तर देतांना आमदार रत्नाकर गुट्टे यांनी विधायक सामाजिक आंदोलनात शिक्षकांनी योगदान द्यावे,असे आवाहन केले तर सूर्यकांत विश्वासराव यांनी शिक्षकांना मिळणार्‍या सर्व सुविधा संघर्षातूनच मिळाल्या आहेत. म्हणून शिक्षकांनी एकसंघ आणि संघर्षसज्ज राहावे, अशा भावना व्यक्त केल्या. प्रास्ताविक यशवंत मकरंद यांनी, तर सूत्रसंचालन डी.के.देवकते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारत कांदे, पी.एस.जाधव, नारायण कदम, माधव शिंदे, बी.एन.शिंदे, माधव घाळगीर, संतोष मलसटवाड, अनंतकुमार विश्वंभर, विठ्ठल शिंदे, सोनु पाटोळे, अनिता मनोहरे यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्यास जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!