शिक्षक माधव गव्हाणे यांना राष्ट्रीय बंधुता शब्दक्रांती साहित्य पुरस्कार प्रदान

शिक्षक माधव गव्हाणे यांना राष्ट्रीय बंधुता शब्दक्रांती साहित्य पुरस्कार प्रदान

सेलू/प्रतिनिधी – तालुक्यातील रायपूर येथील उपक्रमशील आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक माधव गव्हाणे यांना राष्ट्रीय बंधुता शब्दक्रांती साहित्य पुरस्कार दिनांक (१२) शुक्रवार रोजी पुणे येथे प्रदान करण्यात आला आहे.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद, बंधुता प्रतिष्ठान, काषाय प्रकाशन पुणे यांच्या वतीने २५ वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी संमेलनाध्यक्ष मधुश्री ओव्हाळ, पूर्वाध्यक्ष प्रा. शंकर आथरे, उद्घाटक डॉ मनोहर जाधव, स्वागताध्यक्ष प्रा. चंद्रकांत वानखेडे, बंधुताचार्य प्रकाश रोकडे,डॉ बंडोपंत कांबळे आदी उपस्थित होते. पुरस्काराबद्दल स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाचे सचिव डॉ शरद कुलकर्णी, शब्दसह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सर्जेराव लहाने, अक्षर प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद ठाकर, विजय ढाकणे, रामराव गायकवाड, डॉ काशिनाथ पल्लेवाड, रामराव बोबडे, बाळू बुधवंत, माणिक पुरी, नारायण खरात, हनुमान व्हरगुळे, प्रा. अनंत मोगल, डॉ नयन राठोड, पुनमचंद खोना, ग्रंथपाल महादेव आगजाळ आदींनी अभिनंदन केले आहे. माधव गव्हाणे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर येथे सहशिक्षक असून स्वतः चांगले कवी आणि वाचक आहेत. स्वतःबरोबरच त्यांनी त्यांच्या तिसरीच्या वर्गातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून देत विद्यार्थ्यांना लिहितं केलं आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी चांगली पुस्तके वाचून त्यावर समीक्षा व लेखकांना पत्र सुद्धा लिहितात. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!